लंडन: इंग्लंडचा माजी कर्णधार जो रुटचा ( Former England skipper Joe Root ) एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमुळे जो रूटला जादुगार म्हणले जाऊ लागले आहे. कारण लॉर्डस येथे न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या सामन्यात जो रुटने न हात लावता आपली बॅट सरळ उभा केली होती. त्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियवार व्हायरल होत ( Joe Root Bat Video Viral ) आहे.
इंग्लंडचे माजी फुटबॉलपटू आणि सध्याचे क्रीडा प्रसारक गॅरी लिनकर ( Sports broadcaster Gary Linker ) आणि प्रसिद्ध पत्रकार-लेखक पियर्स मॉर्गन यांना सहाय्याशिवाय बॅट सरळ कशी उभी राहू शकते याबद्दल आश्चर्यचकित झाले आहे, मात्र जो रुटने काही वेळ आपली बॅट हात न लावता सरळ उभा करुन दाखवली होती.
-
I knew @root66 was talented but not as magic as this……. What is this sorcery? @SkyCricket #ENGvNZ 🏏 pic.twitter.com/yXdhlb1VcF
— Ben Joseph (@Ben_Howitt) June 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">I knew @root66 was talented but not as magic as this……. What is this sorcery? @SkyCricket #ENGvNZ 🏏 pic.twitter.com/yXdhlb1VcF
— Ben Joseph (@Ben_Howitt) June 5, 2022I knew @root66 was talented but not as magic as this……. What is this sorcery? @SkyCricket #ENGvNZ 🏏 pic.twitter.com/yXdhlb1VcF
— Ben Joseph (@Ben_Howitt) June 5, 2022
रुटच्या नाबाद शतकाच्या जोरावर इंग्लंडने विश्व कसोटी विजेत्या न्यूझीलंडचा पाच विकेट्सनी पराभव करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सामन्यादरम्यान एका प्रसंगी, टीव्ही फुटेजमध्ये रूटची बॅट काही सेकंदांसाठी सरळ उभी असल्याचे दिसले. काही वेळातच ही क्लिप व्हायरल झाली, ज्यामुळे क्रिकेट चाहते थक्क झाले आहेत.
बीबीसीच्या टेस्ट मॅच स्पेशल अकाऊंटद्वारे ट्विटरवर "त्याने (रूट) हे कसे केले?" या मथळ्यासह क्लिप शेअर केल्यानंतर, बीबीसी मॅच ऑफ द डे प्रेझेंटर, लाइनकर यांनी उत्तर दिले, "तो एक जादूगार आहे." टीव्ही व्यक्तिमत्व पियर्स मॉर्गन यांनी ट्विट केले, "हो. तो बॅटचा जादूगार आहे. अशा वेगवेगळ्या कमेंट्स आता सोशल मीडियावर येत आहेत.