ETV Bharat / sports

ICC shares dance video : आयसीसीने शेअर केला भारतीय महिला खेळाडूचा  भांगडा करतानाचा व्हिडिओ - Vice Captain Harmanpreet Kaur

आयसीसीने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार हरमनप्रीत कौर भांगडा करताना ( Harmanpreet Kaur Bhangra Dance ) दिसत आहे. यासोबत यास्तिका भाटिया आणि स्टार बॅट्समन स्मृती मानधनाही डान्स करताना दिसत आहेत.

Smriti Mandhana
Smriti Mandhana
author img

By

Published : Mar 2, 2022, 6:53 PM IST

हैदराबाद : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक ( ICC Women ODI World Cup ) स्पर्धेला 4 मार्च पासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेतील भारत आपला पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे. या अगोदर आंतरराष्ट्री क्रिकेट परिषदेने एक व्हिडीओ शेअर ( International Cricket Council shared a video ) केला आहे. ज्यामध्ये भारतीय महिला संघ खुप आनंदी दिसत आहे. त्याचबरोबर भारतीय संघ आत्मविश्वासाने परिपूर्ण असलेला दिसत आहे.

आयसीसीने जो व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये उपकर्णधार हरमनप्रीत कौर ( Vice Captain Harmanpreet Kaur ) भांगडा करताना दिसत आहे. या व्हिडीओची सुरुवात भांगड्याने होते. त्यानंतर हरमनप्रीत कौर म्हणते, मला फक्त येवढेच करता येते. मी जिथे ही जाते, तेव्हा हे करते. आयसीसीने या व्हिडीओला कॅप्शन देताना लिहले आहे, काही शानदार नृत्यासोबत हास्याचा एक खुराक. भारतीय कॅम्प आनंदाने भरलेला आहे.

तसेच या व्यतिरिक्त व्हिडीओ मध्ये यस्तिका भाटिया डांस करताना दिसत आहे. त्याचबरोबर भारताची स्टार सलामवीर फलंदाज स्मृती मंधाना ( Star batsman Smriti Mandhana ) आणि शेफाली वर्मा हंसताना खुप क्यूट दिसत आहेत. तसेच या व्हिडीओ मध्ये यांच्या व्यतिरिक्त झूलन गोस्वामी, मिताली राज, ऋचा घोष यांच्याबरोबर इतर खेळाडू ही दिसत आहेत.

भारतीय संघाचे विश्वचषक वेळापत्रक -

  • 6 मार्च - भारत विरुद्ध पाकिस्तान - माउंट मौनगानुई
  • 10 मार्च - भारत विरुद्ध न्यूझीलंड - हॅमिल्टन
  • 12 मार्च - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - हॅमिल्टन
  • 16 मार्च - भारत विरुद्ध इंग्लंड - माउंट मौनगानुई
  • 19 मार्च - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ऑकलंड
  • 22 मार्च - भारत विरुद्ध बांगलादेश - हॅमिल्टन
  • 27 मार्च - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - क्राइस्टचर्च

विश्वविजेता ठरणाऱ्या संघाला मिळणार 10 कोटी रुपये -

यावेळी विश्वविजेत्या संघाला सुमारे 10 कोटी रुपये (1.32 दशलक्ष यूएस डॉलर) मिळतील, जे 2017 च्या विश्वचषकादरम्यान विजेत्या संघाला मिळालेल्या रकमेच्या दुप्पट आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या आठ संघांमध्ये सुमारे 26 कोटी रुपयांची रक्कम वितरीत केली जाईल. जी मागील वेळेपेक्षा 11 कोटी रुपयांनी अधिक आहे. तसेच यावेळी उपविजेत्या संघाला 4.51 कोटी रुपये मिळणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.