हैदराबाद: भारतीय संघाचा आणि आरसीबी संघाचा माजी कर्णधार विराट कोहली ( Former captain Virat Kohli ) हा मागील काही महिन्यांपासून खराब फॉर्मशी झुंज देत आहे. तो सातत्याने काही कालावधी पासून भारतीय संघात खेळताना अपयशी ठरला आहे. त्याचबरोबर आता आयपीएल 2022 मध्येही त्याची बॅट तळपताना दिसत नाही. विराट जितका मैदानावर आक्रमक असतो, तितकाच तो मैदानाच्या बाहेर दयाळू आणि दिलदार सुद्धा आहे. त्याचा मैदानाबाहेरचा एक खास किस्सा माजी खेळाडू विवेक राजदानने ( Former Cricketer Vivek Rajdan ) यांनी सांगितला आहे. ज्यामध्ये त्याचा दयाळू आणि दिलदारपणा दिसून येतो .
माजी भारतीय खेळाडू विवेक राजदानने ( Vivek Razdan ) एक किस्सा शेअर केला, ज्यामध्ये विराट कोहलीने आपल्या वर्तनाने सर विव्ह रिचर्ड्सची शाबासकी जिंकली होती. इतकेच नाही तर भारतीय संघाचे विमान कॅरेबियन भूमीवर पोहोचले तेव्हा या अनुभवी खेळाडूने विराट कोहलीच्या पाठीवर थापही दिली होती. भारताने 2019 मध्ये द्विपक्षीय मालिकेसाठी वेस्ट इंडिजचा दौरा केला होता.
त्यावेळी असे घडले की, विव्ह रिचर्ड्स ( Viv Richards ) त्यांची बॅग घेऊन फ्लाइटमध्ये आले, परंतु ओव्हरहेड लॉकरमध्ये जागा भरलेली असल्याने त्यांना जागा मिळू शकली नाही. त्यावेळी त्यांना मदतीची गरज होती. यावेळी मात्र कोहलीशिवाय इतर कोणताही खेळाडू त्यांच्या मदतीला आला नाही. कोहलीने उठून रिचर्ड्सच्या सामानासाठी जागा बनवण्याची जबाबदारी घेतली.
स्पोर्ट्सकीडा शो एसके टेल्समध्ये विवेक राजदान म्हणाले, 2019 मध्ये भारत कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांसाठी वेस्ट इंडिज दौऱ्यावर होता. सर्व सामने वेगवेगळ्या बेटांवर होत होते आणि या कारणास्तव वेस्ट इंडीज क्रिकेटने एक मोठे विमान उपलब्ध करून दिले होत. ज्यामध्ये दोन्ही संघातील खेळाडू, प्रॉडक्शन क्रू, बोर्ड सदस्य आणि इतर सदस्य एकत्र प्रवास करत होते. अँटिग्वामध्ये सामना संपल्यानंतर आम्ही आमच्या पुढच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी निघालो. दोन्ही संघांच्या खेळाडूंना प्रथम फ्लाइटमध्ये आणि नंतर प्रॉडक्शन क्रूला दाखल करण्यात आले. समालोचन संघात सुनील गावस्कर, विव्ह रिचर्ड्स यांचाही समावेश होता.
त्यावेळी असे घडले की, खेळाडू बसले होते आणि फ्लाइट जवळजवळ भरली होती. सर विव्ह रिचर्ड्स ( Sir Viv Richards ) त्यांची बॅग घेऊन फ्लाइटमध्ये दाखल झाले, पण ओव्हरहेड लॉकरमध्ये जागा नसल्यामुळे त्यांना जागा मिळाली नाही. त्यांना खूप काळजी वाटू लागली आणि काही जागा आहे का, हे पाहण्यासाठी ते वेगवेगळे लॉकर उघडून पाहू लागले. अचानक मी पाहिले की विराट उठला आणि सर्वांचे सामान बांधू लागला. सर्वजण बसले आणि कोहलीशिवाय कोणी उठले नाही.
आता हे विसरू नका की, त्यावेळी कोहली हा केवळ भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार नव्हता तर तो जागतिक क्रिकेटमधील सर्वात मोठे नाव होते. शेवटी, कोहलीने स्वतःचे सामान काढले, समोरच्या सीटखाली ठेवले आणि सर रिचर्ड्सनची बॅग तिथे ठेवली. सर विव यांनी त्याची पाठ थोपटली आणि 'धन्यवाद' म्हणाले.
या दौऱ्यावरील एकदिवसीय मालिकेदरम्यान विराट कोहलीने शेवटचे एकदिवसीय शतक झळकावले होते. तेव्हापासून या फॉरमॅटमध्ये त्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी आलेली नाही. कोहलीने आयपीएल 2022 मध्ये मागील पाच डावांमध्ये 9, 0, 0, 12 आणि 1 धावा केल्या आहेत.
हेही वाचा - Ipl 2022 Updates : राजस्थान रॉयल्सच्या माजी सलामीवीराने सांगितले संघाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य