मुंबई - श्रीलंकेचे खेळाडू आणि सुप्रसिद्ध फिरकीपटू मुथय्या मुरलीधरण आणि वीरेंद्र सेहवाग यांची आज मुंबई प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलताना मुरलीधरन यांनी वीरेंद्र सेहवाग हे खूप चांगले खेळाडू होते असे वक्तव्य केले.
मुरलीधर येण्यापूर्वी धावा करायचो - यावेळी बोलताना वीरेंद्र सेहवाग म्हणाले की, मुरलीधरन हे अतिशय निष्णात गोलंदाज आहेत. श्रीलंके विरुद्ध खेळताना मी नेहमी पहिल्या दहा षटकांमध्ये अधिकाधिक धावा गोळा करायचो. किमान 50 धावा पहिल्या दहा षटकात मी केल्या तर आपली संघातील जागा टिकून राहील नाहीतर अकराव्या शतकाला मुरलीधरन आले की आपली विकेट जाईल, असे मला वाटायचे आणि कित्येकदा मुरली यांनी माझी विकेट घेतली आहे.
मला दुसरा कळलाच नाही - मुरलीधरण यांच्या विरुद्ध खेळताना कसे खेळावे असेही सचिन तेंडुलकर यांना विचारले होते, तेव्हा तेंडुलकर म्हणाले की, मुरलीधरन जेव्हा अंगठा वर करतात तेव्हा समजायचे की ते दुसरा टाकत आहेत, म्हणून मी त्यांच्या अंगठ्याकडे नेहमी लक्ष द्यायचो, पण मला त्यांचा वर आलेला अंगठा कधीच दिसला नाही, म्हणून मग मी त्यांच्या विरोधात सगळे फटके ऑफ ड्राईव्हला खेळायचो, त्यामुळे मुरलीधरनही माझी विकेट घेण्याऐवजी धावा वाचवण्याच्या मागे लागायचे आणि माझी विकेट टिकायची, असेही त्यांनी सांगितले.
सेहवाग अतिशय धुरंदर फलंदाज - यानंतर बोलताना मुरलीधरन म्हणाले की, हे सुरुवातीच्या काळात कदाचित खरे असेल परंतु त्यानंतर सेहवाग यांना कसे आऊट करायचे हा मला प्रश्न पडायचा. एका दिवशी 293 धावा केल्या होत्या त्यावेळेस आमच्या नाकीनऊ आले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला आउट करण्याची संधी मला मिळाली, असेही मुरली यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा -