ETV Bharat / sports

Cricketer Virender Sehwag: वीरेंद्र सेहवागने सांगितले, त्याच्या जीवनातील 29 मार्चचे महत्व; जाणून घ्या एका क्लिकवर - क्रिकेटमधील त्रिशतक

माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग ( Explosive batsman Virender Sehwag ) याच्या जीवनात 29 मार्च खुप महत्व आहे. 29 मार्च या तारखेचे त्याच्या जीवनात काय महत्व आहे, याबद्दल त्याने ट्विट करुन माहिती दिली आहे.

Virender Sehwag
Virender Sehwag
author img

By

Published : Mar 29, 2022, 9:06 PM IST

हैदराबाद: भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग ( Batsman Virender Sehwag ) आतंरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त बरीच वर्ष झाली आहे. परतु तो अध्याप ही क्रिकेटच्या दुनियेत अॅक्टिव्ह आहे. तो आपल्या ट्विटर हँडलवरील ट्विटवरुन नेहमीच खुप चर्चेत असतो. ट्विटरवरील त्यांची टिप्पणी केवळ व्यंग्यात्मकच नाही, तर अतिशय मजेदार आणि मनोरंजकही आहे. सेहवाग कोणत्याही मुद्द्यावर उपहासात्मक ट्विट करायला मागेपुढे पाहत नाही.

आज 29 मार्च 2022 आहे आणि या तारखेबाबत वीरेंद्र सेहवागने एक अतिशय मनोरंजक ट्विट केले आहे. सेहवागने सांगितले की, ही तारीख त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे. या तारखेला त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत आणि आयुष्यात किती मोठ्या गोष्टी घडल्या आहेत. 29 मार्च या तारखेला वीरेंद्र सेहवागच्या जीवनात खुप महत्वपूर्ण स्थान आहे.

  • Date mein kya rakha hai?
    March 29th, a very significant date in my cricketing life. Got to the first triple hundred against Pakistan in Multan on this date and got out on 319 against South Africa on this very date.
    Coincidentally, without plan have a car which is numbered 2903. pic.twitter.com/tJ1rf3GPbw

    — Virender Sehwag (@virendersehwag) March 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

वीरेंद्र सेहवाग एक ट्विटमध्ये म्हणाला, "तारखेत काय ठेवले आहे? 29 मार्च हा माझ्या क्रिकेट कारकिर्दीसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी मी पाकिस्तानविरुद्ध मुलतानमध्ये पहिले त्रिशतक झळकावले. त्याच तारखेला मी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 319 धावा करून बाद झालो. मजेशीर गोष्ट म्हणजे माझ्याकडे एक कार आहे, ज्याचा नंबर 2903 आहे. जरी मी याबद्दल कोणतेही नियोजन केले नव्हते, तरी देखील हा नंबर मला योगायोगाने मिळाला.''

वीरेंद्र सेहवागचे पहिले त्रिशतक -

वीरेंद्र सेहवागने आजच्या दिवशी म्हणजे 18 वर्षापूर्वी 29 मार्च 2004 साली पाकिस्तान विरुद्ध कसोटी सामना खेळताना, आपल्या कारकिर्दीतील पहिले त्रिशतक झळकावले होते. सेहवागने सक्लेन मुश्ताकच्या चेंडूवर षटकार मारत त्याचे पहिले कसोटी त्रिशतक अवघ्या 364 चेंडूत साजरे केले होते. त्याने त्या सामन्यात 375 चेंडूत 309 धावा केल्या. या खेळीत त्याने 34 चौकार आणि 6 षटकार मारले लगावले होते. वीरेंद्र सेहवागने आपले दुसरे त्रिशतक सुद्धा पहिल्या त्रिशतकानंतर बरोबर चार वर्षांनी त्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ठोकले होते. या सामन्यात तिसऱ्या दिवशी (28 मार्च) त्याने 278 चेंडूत त्याचे कसोटीतील दुसरे त्रिशतक पूर्ण केले. त्यावेळी तो कसोटीमध्ये सर्वात जलद त्रिशतक करणारा पहिला फलंदाज ठरला होता. तसेच आजही हा विक्रम फक्ता वीरेंद्र सेवागच्या नावावर आहे.

हेही वाचा - Gt Vs Lsg : 'फलंदाज म्हणून मला अधिक जबाबदारी घ्यायचीय' विजयानंतर हार्दिक पांड्याचे वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.