ETV Bharat / sports

Virat Kohli Record : किंग कोहलीचा आणखी एक विश्वविक्रम! सचिनचा १९ वर्ष जुना रेकॉर्ड मोडला - विराट कोहलीची विक्रम

Virat Kohli Record : पाकिस्तानविरुद्ध विराट कोहलीनं ९४ चेंडूत नाबाद १२२ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्यानं सचिन तेंडुलकरचा १९ वर्ष जुना विक्रम मोडीत काढला. काय आहे हा विक्रम, जाणून घेण्यासाठी वाचा पूर्ण बातमी..

Virat Kohli Record
Virat Kohli Record
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 9:35 PM IST

कोलंबो Virat Kohli Record : पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आज विराट कोहलीचं रौद्र रुप पाहायला मिळालं. त्यानं ९४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीनं नाबाद १२२ धावा ठोकल्या. हे त्याचं एकदिवसीय क्रिकेटमधील ४७ वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एकूण ७७ वे शतक होतं.

सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला : विराट कोहलीनं या खेळीदरम्यान अनेक विक्रमांना गवसणी घातली. कोहली आता एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद गतीनं १३ हजार धावा पूर्ण करणारा फलंदाज बनला आहे. कोहलीनं या बाबतीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. तेंडुलकरनं ३२१ डावात १३ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. विराटला ही कामगिरी करण्यासाठी केवळ २६७ डाव लागले.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद १३००० धावा करणारे फलंदाज :

  1. विराट कोहली (भारत) - २६७ डाव, कोलंबो २०२३
  2. सचिन तेंडुलकर (भारत) - ३२१ डाव, रावळपिंडी २००४
  3. रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) - ३४१ डाव, ओव्हल २०१०
  4. कुमार संगकारा (श्रीलंका) - ३६३ डाव, हंबनटोटा २०१४
  5. सनथ जयसूर्या (श्रीलंका) - ४१६ डाव, डंबुला २००९

असाही योगायोग : विराट कोहलीच्या या कामगिरीनंतर एक अद्भूत योगायोग साधल्या गेला. कोहलीनं सचिन तेंडुलकरचा विक्रम त्याच्याचं स्टाईलमध्ये मोडला. तेंडुलकरनं पाकिस्तानविरुद्धच १३ हजार धावा पूर्ण केल्या होत्या. विशेष म्हणजे, या सामन्यात सचिननही शतक ठोकलं होतं. १६ मार्च २००४ रोजी रावळपिंडीत त्यानं ३२१ व्या डावात ही कामगिरी केली. त्या सामन्यात सचिननं १४१ धावांची शानदार खेळी केली होती. सचिन तेंडुलकरप्रमाणे विराटनंही आज पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावून १३ हजार धावा पूर्ण केल्या.

  • विराट कोहलीची कारकीर्द : विराटनं आतापर्यंत २७८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं ५७.६२ च्या सरासरीनं १३०२४ धावा कुटल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १८३ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. पाकिस्तानविरुद्ध २०१२ मध्ये त्यानं ही कामगिरी केली होती. विराटच्या नावे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सध्या ४७ शतके आणि ६५ अर्धशतकं आहेत.

हेही वाचा :

  1. MS Dhoni spotted playing golf : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसोबत माहीने खेळला गोल्फ; फोटो व्हायरल
  2. Demand Of Team Bharat : खेळाडूंच्या जर्सीवर 'टीम इंडिया'ऐवजी 'टीम भारत' लिहिण्याची वीरेंद्र सेहवागची मागणी
  3. World Cup २०२३ : एकदिवसीय विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, जाणून घ्या कोणाची लागली लॉटरी, कोणाचा पत्ता कट झाला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.