ETV Bharat / sports

IND vs ENG : विराट कोहलीच्या बॅटिंग अप्रोचवर सुनील गावसकरांनी उठवला सवाल - भारत वि. इंग्लंड लॉर्डस् कसोटी

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर, विराट कोहलीच्या बॅटिंग अप्रोचवर नाखूश दिसले. त्यांनी विराटला कसोटी फॉर्मेटमध्ये व्ही सेफमध्ये खेळण्याचा सल्ला दिला.

Virat Kohli hasn't really played well, the method has to differ, says Gavaskar
IND vs ENG : विराट कोहलीच्या बॅटिंग अप्रोचवर सुनील गावसकरांनी उठवला सवाल
author img

By

Published : Aug 16, 2021, 4:28 PM IST

मुंबई - भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा खराब फॉर्म भारतीय संघासाठी डोकेदुखी ठरत आहे. विराट धावा करण्यात अपयशी ठरत आहे. त्याने अखेरचे शतक 2019 मध्ये ठोकलं होतं. इंग्लंडविरुद्ध खेळवण्यात येत असलेल्या कसोटी मालिकेतील 4 डावात विराटला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. लॉर्डस् कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात विराट कोहलीने शानदार सुरूवात केली होती. पण तो मोठी खेळी साकारू शकला नाही आणि त्यांची कमजोरी समोर आली. या दरम्यान, भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर, विराटच्या बॅटिंग अप्रोचवर नाखूश दिसले. त्यांनी विराटला कसोटी फॉर्मेटमध्ये व्ही सेफमध्ये खेळण्याचा सल्ला दिला.

गावसकर म्हणाले की, व्ही सेफ विराटसाठी उपयुक्त ठरला आहे. बॅक आणि मूव्हमेंटसोबत त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 8 हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. पण तो ऑफ स्टम्पपासून बाहेर जाणाऱ्या चेंडूवर लवकर खेळण्याचा प्रयत्न करत आहे. यादरम्यान, त्याचे पाय कुठं तर बॅट कुठं असल्याचे दिसते. ज्यामुळे तो त्या चेंडूवर चांगल्या पद्धतीने खेळू शकलेला नाही.

मला वाटत की, प्रत्येक फलंदाजाला त्याची स्वत:ची टेकनिक शोधण्यासाठी एकटं सोडलं पाहिजे. हा कसोटी सामना आहे. एकदिवसीय आणि टी-20 सामन्याची परिस्थिती एकदम वेगळी असते. पण कसोटीत तुम्हाला व्ही सेफमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे देखील गावसकर म्हणाले.

दरम्यान, भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना निर्णायक अवस्थेत पोहोचला आहे. भारताने चौथ्या दिवसाअखेर 6 बाद 181 धावा केल्या आहेत. भारताकडे 154 धावांची आघाडी झाली आहे. अंधूक सूर्यप्रकाशामुळे चौथ्या दिवशी खेळ लवकर थांबवण्यात आला तेव्हा ऋषभ पंत १४ आणि इशांत शर्मा ४ धावांवर खेळत होता.

हेही वाचा - टोकियो ऑलिम्पिकवीरांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ब्रेकफास्ट

हेही वाचा - Ind Vs Eng 2nd test : भारत-इंग्लंड कसोटी निर्णायक अवस्थेत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.