ETV Bharat / sports

SAvIND 3rd Test : तिसऱ्या पंचांनी डीन एल्गर नाबाद घोषित केल्यानंतर विराट आणि त्याच्या सहकाऱ्यांनी 'असा' व्यक्त केला राग; पहा व्हिडीओ - Captain Virat Kohl

दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱ्या ( South Africas second innings ) डावाच्या 21व्या षटकात, रविचंद्रन अश्विनने एल्गरला पायचित केले (Ravichandran Ashwin traps Elgar ) होते. मैदानी पंचानी देखील घोषित त्याला बाद घोषित केले होते. त्यानंतर तिसऱ्या पंचांनी त्याला नाबाद घोषित केले. त्यामुळे भारतीय खेळाडूंनी आपला राग व्यक्त करताना आपला संयम गमावला.

virat kohli
virat kohli
author img

By

Published : Jan 14, 2022, 1:51 PM IST

केपटाऊन: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात तिसऱ्या कसोटीतील ( India v South Africa 3rd Test ) आज चौथा दिवस आहे. दक्षिण आफ्रिका संघाला आज विजयासाठी 111 धावांची गरज आहे. त्याचबरोबर भारताला विजयासाठी 8 विकेट्स घेण्याची गरज आहे. परंतु काल तिसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात भारतीय कर्णधार आणि विराट कोहली आणि त्याच्या संघसहकाऱ्यांना राग अनावर करताना दिसून आले.

दक्षिण आफ्रिका संघाला भारताने 212 धावांचे लक्ष्य दिले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दुसरऱ्या डावाल सुरुवात झाली होती. या डावाच्या 21व्या षटकात, रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर कर्णधार डीन एल्गर ( Captain Dean Elgar ) पायचित झाला. त्यावर भारतीय खेळाडूंनी आणि आश्विनने जोरदार अपील केली. त्यानंचर मैदानी पंचांनी सुद्धा एल्गर पायचित केले. त्यामुळे भारतीय गोलंदाज आनंद व्यक्त करत होते. त्यावेळी एल्गरने डीआरएस घेतला ( Elgar took the DRS ). त्यामुळे हा निर्णय तिसऱ्या पंचांंकडे गेला. तिसऱ्या पंचांनी आपल्या रिप्लेमध्ये चेंडू यष्टीच्या वरुन जातोय असे दाखवले. त्याचबरोबर एल्गरला नाबाद घोषित केले. तिसऱ्या पंचांच्या या निर्णयाने विराट कोहली आणि इतर भारतीय खेळाडू संतापले. त्यामुळे त्यांनी शाब्दिक पद्दतीने राग व्यक्त करत निराश झाले. भारतीय खेळाडूंना माहित होते की, त्यांचे प्रत्येक संभाषण स्टंप माइकमध्ये रेकॉर्ड केले जात आहे. अशा परिस्थितीत ही त्यांनी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी त्याचा वापर केला.

यादरम्यान एक भारतीय खेळाडू म्हणाला की, संपूर्ण देश ११ खेळाडूंच्या विरोधात आहे. तर दुसरा खेळाडू म्हणाला, "ब्रॉडकास्टर पैसे कमावण्यासाठी आला आहे." तसेच अजून एक भारतीय खेळाडू म्हणाला, "मला आशा आहे की, मायक्रोफोन आमचे बोलणे रेकॉर्ड करत आहे." अश्विन सुद्धा ब्रॉडकास्टरच्या बॉल-ट्रॅकिंग तंत्रावर टीका ( Ashwin criticized broadcasters ball-tracking technique )करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. अश्विन म्हणाला, 'सुपरस्पोर्ट' तुम्हाला जिंकण्यासाठी आणखी चांगले मार्ग शोधले पाहिजेत." तसेच यावर कोहली आवर्जून यष्टीच्या माईकजवळ जावून म्हणाला, "फक्त विरोधी पक्षांवर नाही, तर आपल्या संगावर हीलक्ष द्या.'' प्रत्येकवेळी लोकांना पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारे तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय कर्णधार विराट कोहली ( Captain Virat Kohli ) आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खेळाच्या शेवटच्या 45 मिनिटांत निराश होत आपला संयम गमावला. तीन सामन्यांची मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे.

हेही वाचा - SAvIND 3rd Test : दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 111 धावांची गरज ; तर भारत 8 विकेट्सने दूर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.