मुंबई : आयपीएल 2022 ( IPL 2022 ) च्या हंगामाला 26 मार्च पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे आता स्पर्धा सुरु होण्यासाठी फक्त सहा दिवसाचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे प्रत्येक संघातील खेळाडू आपआपल्या संघाशी जोडले जात आहे. तर काही खेळाडू अजून ही संघाशी जोडले गेले नाहीत. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा प्रमुख गोलंदाज पॅट कमिन्स अजून संघाशी जोडला गेला नाही. परंतु त्याने संघात सामिल होण्यागोदर एक प्रतिक्रिया ( Pat Cummins' reaction ) दिली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा ( Kolkata Knight Riders team ) प्रमुख वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा सध्या पाकिस्तान येथे सुरु असलेल्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. कमिन्सने आगामी आयपीएल हंगामासाठी केकेआर संघात सामील होण्याची उत्सुकता व्यक्त केली आहे. मेगा लिलावात केकेआरने अनेक जुन्या खेळाडूंना खरेदी केले असून त्यामध्ये कमिन्सचे नावही त्यापैकी एक आहे. फ्रेंचायझीने जुना संघ कायम ठेवण्याचा प्रयत्न केल्याने वेगवान गोलंदाज आनंदी आहे.
वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स स्पोर्टस्टार सोबत बोलताना ( Fast bowler Pat Cummins ) म्हणाला, मी खुप उत्साही आहे. हे खुप चांगले आहे की, संघात अधिकत्तर रिटेन केलेले खेळाडू एकमेकांना चांगल्या प्रकारे ओळखतात. त्याचबरोबर पॅट कमिन्स हा श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी खुप उत्साही आहे.
पॅट कमिन्स पुढे म्हणाला, श्रेयस आणि मी दिल्ली संघासाठी एकत्र खेळलो (डेअर डेव्हिल्स) आहे, आम्ही खरोखर चांगले खेळलो आहोत. तो खूप शांत व्यक्ती आहे आणि सध्या फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. मी तिथे येण्यासाठी खूप उत्साहित आहे, माझे काही जवळचे मित्र आहेत ज्यांच्यासोबत खेळण्यासाठी आता मी वाट पाहू शकत नाही.