ETV Bharat / sports

ICC World Cup 2023 : दोन वेळच्या चॅम्पियन वेस्ट इंडिजवर मोठी नामुष्की, स्कॉटलंडविरुद्ध पराभवासह वर्ल्ड कपमधून बाहेर - एकदिवसीय विश्वचषक 2023

विश्वचषक क्वालिफायर सामन्यात स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. या पराभवासह वेस्ट इंडिजचा संघ यावर्षी भारतात होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडला आहे.

WEST INDIES cricket
वेस्ट इंडिज क्रिकेट संघ
author img

By

Published : Jul 1, 2023, 10:51 PM IST

हरारे : दोन वेळचा विश्वविजेता वेस्ट इंडिज भारतात होणाऱ्या आयसीसी वनडे विश्वचषकातून बाहेर पडला आहे. 48 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एकदिवसीय विश्वचषक वेस्ट इंडिजशिवाय खेळला जाणार आहे. झिम्बाब्वे येथे खेळल्या गेलेल्या विश्वचषक पात्रता फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात स्कॉटलंडने वेस्ट इंडिजचा 7 विकेट्सने पराभव करत मोठा उलटफेर केला. स्कॉटिश संघाने प्रथम वेस्ट इंडिजला 181 धावांवर ऑल आऊट केले आणि नंतर 43.3 षटकात 3 विकेट गमावत 185 धावा करून लक्ष्य सहज गाठले. 1970 आणि 1980 च्या दशकातील सर्वात मजबूत संघ असलेल्या वेस्ट इंडिजसाठी हा खूप मोठा धक्का मानला जातो आहे.

स्कॉटलंडने केला सहज पराभव : स्कॉटलंड संघाने वेस्ट इंडिजचा 7 विकेट्सने धुव्वा उडवला आणि विंडिजचे 2023 विश्वचषकात खेळण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. या सामन्यात स्कॉटलंडचा कर्णधार रिची बेरिंग्टनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. वेस्ट इंडिजचा संघ स्कॉटिश गोलंदाजांपुढे पुरता गारद झाला. त्यांनी प्रथम फलंदाजी करताना 43.5 षटकांत अवघ्या 181 धावांपर्यंत मजल मारली. वेस्ट इंडिजकडून जेसन होल्डरने 45 आणि रोमॅरियो शेफर्डने 36 धावा केल्या. 182 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना स्कॉटिश संघाने यष्टिरक्षक फलंदाज मॅथ्यू क्रॉस (नाबाद 74) आणि सामनावीर ब्रँडन मॅकमुलेन (3 विकेट, 69 धावा) यांच्या खेळीच्या बळावर सहज विजय मिळवला.

इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजशिवाय वर्ल्डकप : एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या 48 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच वेस्ट इंडिजचा संघ स्पर्धेत सहभागी होणार नाही. दिग्गज कर्णधार क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडिज संघाने 1975 आणि 1979 मध्ये सलग दोनदा विश्वचषक जिंकला होता. 1983 च्या विश्वचषकातही वेस्ट इंडिज संघ अंतिम फेरीत पोहोचला होता, जिथे कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने त्यांचा पराभव केला होता. वेस्ट इंडिज संघाची अलीकडची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहीली आहे. यापूर्वी, वेस्ट इंडिजचा संघ 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2022 च्या टी-20 विश्वचषकाचा देखील भाग बनू शकला नव्हता.

  • Champions in 1975.
    Champions in 1979.

    No West Indies in 2023 World Cup.

    Sad to see the downfall of West Indies - first time in ODI World Cup history. pic.twitter.com/40GH4Tj1EH

    — Johns. (@CricCrazyJohns) July 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • Heartbreak for West Indies in Harare as Scotland beat them for the first time in an ODI and send them out of the race for #CWC23 👀#SCOvWI report 👇

    — ICC (@ICC) July 1, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • - No West Indies in 2017 CT.
    - No West Indies in 2022 T20 WC.
    - No West Indies in 2023 ODI WC.

    Cricket needs a strong West Indies but the downfall is sad & tough to digest in the last few decades. pic.twitter.com/vZ5JgXXbIC

हेही वाचा :

  1. Team India Sponsor : टीम इंडियाच्या नवीन स्पॉन्सरची घोषणा, आता जर्सीवर दिसणार 'या' कंपनीचा लोगो
  2. Asian Kabaddi Championship : भारतीय कबड्डी संघाने रचला इतिहास, आठव्यांदा पटकावले आशियाई कबड्डी चॅम्पियनशिपचे विजतेपद

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.