ETV Bharat / sports

IPL 2022 Updates: आयपीएल सामन्यांच्या तिकीट विक्रीला 'या' तारखेपासून सुरुवात - आयपीएलचा पंधरावा हंगाम

आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला 26 मार्चला सुरुवात होणार आहे. या सामन्यांच्या तिकिटांच्या विक्री बाबत बीसीसीआयने महत्वाची माहिती ( BCCI Informed ) दिली आहे. यंदा पहिला सामना सीएसके विरुद्ध केकेआर संघात होणार आहे.

IPL
IPL
author img

By

Published : Mar 23, 2022, 9:27 PM IST

मुंबई: जगातील सर्वात मोठी टी-20 लीग आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला ( Fifteenth season of IPL ) 26 मार्चला म्हणजे फक्त तीन दिवसात सुरुवात होणार आहे. या हंगामाच्या ट्रॉफीवर दावेदारी सिद्ध करण्यासाठी दहा संघ सज्ज झाले आहे. त्याचबरोबर आयोजकांनी आयपीएलच्या सामन्यासाठी एकूण आसन क्षमतेच्या 25 टक्के लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर आयपीएल सामन्याच्या तिकीट विक्रीबद्दलची माहिती बीसीसीआयने दिली आहे. त्यानुसार 23 मार्चला तिकिटांची विक्री सुरु होणार आहे.

  • 𝗧𝗵𝗲 𝘄𝗮𝗶𝘁 𝗶𝘀 𝗼𝘃𝗲𝗿 👏 👏

    Tickets for #TATAIPL 2022 will be 𝗟𝗜𝗩𝗘 from 12PM IST onwards today 👍 👍

    Go grab your tickets 🎫 🎫 - See you at the stands! 🏟️ 📣

    Details below 🔽

    — IndianPremierLeague (@IPL) March 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आयपीएलच्या पंधाराव्या हंगामाचे 70 सामने महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे शहरातील स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. आयपीएलच्या 15 व्या हंगामातील (IPL 2022) सामन्यांसाठी जी तिकीट विक्री ( IPL Ticket Sale ) होणार आहे, ती ऑनलाईन पद्धतीने दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होईल. याबद्दल बीसीसीआयने माहिती दिली आहे. बीसीसीआयने माहिती दिली की, मुंबई आणि पुणे दोन्ही शहरांमधील सामन्यांसाठी बुधवारपासून तिकीटविक्री सुरू होईल.

सर्व सामन्यांसाठी, स्टेडियमच्या क्षमतेनुसार 25 टक्के चाहत्यांना येण्याची परवानगी देण्यात आली आहे. ज्या चाहत्यांना स्टेडियममध्ये जाऊन सामना पाहायचा आहे, ते www.iplt20.com आणि www.BookMyShow.com वर जाऊन तिकीट खरेदी करू शकतात. तिकीट विक्री सुरू झाली आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.

शनिवार आणि रविवारी एकूण 12 डबल हेडर सामने होणार आहेत. स्पर्धेचे सामने मुंबईतील तीन वेगवेगळ्या स्टेडियमवर खेळवले जातील. यानंतर पुण्यातही सामने होणार आहेत. दिवसाचे सामने दुपारी 3.30 वाजता सुरू होतील. त्याचवेळी रात्रीचे सामने सायंकाळी 7.30 वाजता सुरू होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 29 मे रोजी होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमशिवाय ब्रेबॉर्न स्टेडियम आणि डीवाय पाटील स्टेडियमवर सामने होणार आहेत. याशिवाय पुण्यातही सामने होणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.