किंग्जस्टोन - वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान यांच्यातील पहिला कसोटी सामना रोमांचक झाला. यजमान वेस्ट इंडिज संघाने या सामन्यात 1 विकेटने विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघाचा माजी फलंदाज व्ही. व्ही. एस लक्ष्मण याने विंडीज संघाचे कौतुक केले.
व्ही. व्ही. एस लक्ष्मण म्हणाला की, सबिना पार्कवर झालेल्या अविश्वसनीय सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला. हा विजय आयुष्यभरात आठवणीत राहणारा आहे. केमार रोचने चांगली फलंदाजी केली. तर युवा जायडेन सिल्स याने आपण भविष्य असल्याचे दाखवून दिले.
-
That winning moment!🙌🏾 Sabina Park has witnessed history! #WIvPAK #MenInMaroon pic.twitter.com/OGJef9rWcV
— Windies Cricket (@windiescricket) August 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">That winning moment!🙌🏾 Sabina Park has witnessed history! #WIvPAK #MenInMaroon pic.twitter.com/OGJef9rWcV
— Windies Cricket (@windiescricket) August 15, 2021That winning moment!🙌🏾 Sabina Park has witnessed history! #WIvPAK #MenInMaroon pic.twitter.com/OGJef9rWcV
— Windies Cricket (@windiescricket) August 15, 2021
दरम्यान, जायडेन सिल्स याने या सामन्यात पाच गडी बाद केले. त्याच्या या कामगिरीमुळे पाकिस्तानच्या संघाला 203 धावांपर्यंत मजल मारता आली. तो अशी कामगिरी करणारा वेस्ट इंडिजचा युवा खेळाडू ठरला. त्याने 19 वर्ष 338 दिवसांचा असताना ही किमया केली.
पाकिस्तानने विजयासाठी दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची अवस्था 3 बाद 38 अशी केविलवाणी झाली. तेव्हा जेरमिन ब्लॅकवूड आणि रोस्टन चेज या जोडीने 68 धावांची भागिदारी करत संघाचा सुस्थितीत आणले. तेव्हा फहिम अश्रफ आणि हसन अलीने भेदक गोलंदाजी करत वेस्ट इंडिजची अवस्था 8 बाद 142 अशी केली. अशात आणखी एक विकेट गेली.
पाकिस्तान विजयापासून एक विकेट दूर होता. तर वेस्ट इंडिजला विजयासाठी 18 धावांची गरज होती. तेव्हा नवव्या नंबरवर फलंदाजीसाठी आलेल्या केमार रोच याने जायडेन सिल्ससोबत 18 धावांची भागदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
वेस्ट इंडिजने या विजयासह दोन सामन्याच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, ही स्पर्धा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतर्गत खेळवली जात आहे. उभय संघातील दुसऱ्या सामन्याला 20 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे.
हेही वाचा - IND vs ENG : विराट कोहलीच्या बॅटिंग अप्रोचवर सुनील गावसकरांनी उठवला सवाल
हेही वाचा - Ind vs Eng : पंचांच्या त्या निर्णयावर भडकला विराट कोहली, पॅव्हेलियनमधून केले इशारे