हैदराबाद : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2022 ( ICC Women ODI World Cup 2022 ) स्पर्धेला गुरुवार (4 मार्च) पासून सुरुवात होणार आहे. यंदा भारतीय महिला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय महिला संघाच्या नेतृत्वाची धुरा मिताली राजच्या ( Captain Mithali Raj ) खांद्यावर असणार आहे.
आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतील भारताचा पहिला सामना पाकिस्तान विरुद्ध ( India v Pakistan ) होणार आहे. हा सामना 6 मार्चला खेळला जाणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघ सात सामने खेळणार आहे. साखळी फेरीतील भारताचा शेवटचा सामना दक्षिण आफ्रिके विरुद्ध क्राइस्टचर्च ( India against South Africa ) येथे पार पडणार आहे.
-
💬 💬 "It's important to peak at the right time in the World Cup."#TeamIndia Captain @M_Raj03 shares her thoughts about momentum ahead of the #CWC22. 👍 👍 pic.twitter.com/1XiTFDtleb
— BCCI Women (@BCCIWomen) February 26, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">💬 💬 "It's important to peak at the right time in the World Cup."#TeamIndia Captain @M_Raj03 shares her thoughts about momentum ahead of the #CWC22. 👍 👍 pic.twitter.com/1XiTFDtleb
— BCCI Women (@BCCIWomen) February 26, 2022💬 💬 "It's important to peak at the right time in the World Cup."#TeamIndia Captain @M_Raj03 shares her thoughts about momentum ahead of the #CWC22. 👍 👍 pic.twitter.com/1XiTFDtleb
— BCCI Women (@BCCIWomen) February 26, 2022
या सात संघासोबत भारतीय संघ करणार दोन हात -
या स्पर्धेत भारतीय महिला संघ ( Indian women team ) सात संघाविरुद्ध दोन हात करताना दिसणार आहे. यामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिका या सात संघाचा समावेश आहे.
टीम इंडिया कधी आणि कोणासोबत भिडणार?
- 6 मार्च - भारत विरुद्ध पाकिस्तान - माउंट मौनगानुई
- 10 मार्च - भारत विरुद्ध न्यूझीलंड - हॅमिल्टन
- 12 मार्च - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - हॅमिल्टन
- 16 मार्च - भारत विरुद्ध इंग्लंड - माउंट मौनगानुई
- 19 मार्च - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - ऑकलंड
- 22 मार्च - भारत विरुद्ध बांगलादेश - हॅमिल्टन
- 27 मार्च - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - क्राइस्टचर्च