ETV Bharat / sports

200th T20 Of Team India : टीम इंडियाचा आज 200 वा टी 20 सामना, जाणून घेऊया टी 20 मधील भारताचे काही मोठे विक्रम - भारत आणि वेस्ट इंडिज

टीम इंडियासाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे. टीम इंडिया आज वेस्ट इंडिज विरुद्ध 5 सामन्यांच्या मालिकेतील पहिला T20 सामना खेळणार आहे, जो टीम इंडियाचा 200 वा T20 आंतरराष्ट्रीय सामना असेल. (200th T20 Of Team India)

Team India to face 200th T20 today
टीम इंडियाचा आज 200 वा टी 20 सामना
author img

By

Published : Aug 3, 2023, 6:10 PM IST

Updated : Aug 3, 2023, 6:22 PM IST

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 5 सामन्यांच्या टी 20 मालिकेतील पहिला सामना आज रात्री 8 वाजल्यापासून खेळवला जाणार आहे. भारतासाठी हा ऐतिहासिक सामना आहे. कारण टीम इंडिया आज 200 वा टी 20 सामना खेळणार आहे. टीम इंडियाचा टी20 इंटरनॅशनलमध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड उत्कृष्ट आहे आणि तो सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 199 टी 20 सामने खेळले असून त्यांची विजयाची टक्केवारी 66.48 आहे. भारताने एकदा T20 विश्वचषक जिंकला आहे. पाहूया भारताच्या टी 20 च्या काही खास विक्रमांबद्दल.

  • India will be playing 200th T20I match -

    Most runs for India: Kohli
    Highest average for India: Kohli
    Most fifties for India: Kohli
    Most fifty plus for India: Kohli
    Most fours for India: Kohli
    Most runs in WC for India: Kohli
    Most runs in Asia Cup for India: Kohli

    - The GOAT. pic.twitter.com/PCDhqoqmR3

    — Johns. (@CricCrazyJohns) August 3, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

T20 मध्ये भारताचा विक्रम : भारताने आतापर्यंत 199 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात 127 जिंकले आहेत आणि 63 सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे. T20 मध्ये भारताची विजयाची टक्केवारी 66.48 आहे, जी खूप प्रभावी आहे. यादरम्यान भारताने श्रीलंकेविरुद्ध सर्वाधिक २९ टी-२० सामने खेळले आहेत आणि इंग्लंडविरुद्ध विजयाची टक्केवारी सर्वात कमी आहे.

200 - T20 सामने खेळणारा दुसरा संघ : भारताने आतापर्यंत 199 टी-20 सामने खेळले असून आजचा वेस्ट इंडिज विरुद्धचा टी-20 सामना हा त्याचा 200 वा टी-20 सामना असेल. यासह टीम इंडिया २०० टी-२० सामने खेळणारा दुसरा संघ बनणार आहे. 223 टी-20 सामने खेळणारा पाकिस्तान हा सर्वाधिक टी-20 खेळणारा संघ आहे.

विराट कोहली सर्वाधिक धावा करणारा फलंदाज : स्टार फलंदाज विराट कोहलीने टी-20 फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने 115 सामन्यांच्या 107 डावांमध्ये 53 च्या सरासरीने 4008 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे ज्याने 148 सामन्यात 3853 धावा केल्या आहेत.

युजवेंद्र चहल सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज : स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या नावावर टी-20मध्ये भारताकडून खेळताना सर्वाधिक विकेट्स आहेत. चहलने 75 सामन्यात 90 विकेट घेतल्या आहेत. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही 87 टी-20 सामन्यात 90 बळी घेतले आहेत.

रोहित शर्माने सर्वाधिक शतके झळकावली : कर्णधार रोहित शर्माने भारताकडून टी-20 मध्ये सर्वाधिक 4 शतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या 118 आहे. डॅशिंग फलंदाज सूर्यकुमार यादवनेही टी-20 मध्ये 3 शतके झळकावली आहेत.

Last Updated : Aug 3, 2023, 6:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.