जिलॉन्ग : T20 World Cup SL vs NAM: ऑस्ट्रेलियात आजपासून T20 विश्वचषकाचा थरार सुरू झाला आहे. आज झालेल्या पहिल्या सामन्यात नामिबियाने 2014 च्या चॅम्पियन श्रीलंकेचा 55 धावांनी पराभव केला. यासह नामिबियाने श्रीलंकेकडून मागील पराभवाचा बदलाही घेतला. यापूर्वी, नामिबिया आणि श्रीलंका 2021 च्या T20 वर्ल्डमध्ये आमनेसामने आले होते ज्यात श्रीलंकेने त्यांचा सात विकेट्सने पराभव केला होता. Namibia Beats Srilanka
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नामिबियाने श्रीलंकेला विजयासाठी 164 धावांचे लक्ष्य ठेवले होते. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाची सुरुवात अतिशय खराब झाली आणि 19 षटकांत त्यांचा सर्वबाद 108 धावा झाल्या.
प्रथम फलंदाजी करताना नामिबियाने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 163 धावा केल्या. नामिबियाकडून जॉन फ्रीलिनने 44 धावा केल्या. त्याने 28 चेंडूंच्या खेळीत चार चौकार मारले. श्रीलंकेकडून प्रमोद मदुशनने सर्वाधिक दोन बळी घेतले.
नामिबियाने 10 ते 15 षटकांमध्ये तीन विकेट गमावल्या : प्रथम फलंदाजी करताना 15 नंतर नामिबियाची धावसंख्या 95/6 होती. नामिबियाने 10 ते 15 षटकांमध्ये तीन विकेट गमावल्या. कर्णधार गेरहार्ड इरास्मस (20), स्टीफन बार्ड (26) आणि डेव्हिड विसे (0) बाद झाले.
10 षटकांनंतर नामिबियाचा स्कोअर 59/3 दोन्ही सलामीवीर गमावल्याने नामिबियाचा संघ संकटात सापडला होता. दहा षटकांनंतर नामिबियाची धावसंख्या तीन बाद 59 अशी होती.
पहिल्या पाच षटकांत प्रथम फलंदाजी करताना नामिबियाची सुरुवात खराब झाली. मायकेल व्हॅन लिंगेन (3), दिवान ला कॉक (9) आणि निकोल लॉफ्टी ईटन (20) बाद झाले आहेत. पाच षटकांनंतर नामिबियाची धावसंख्या तीन बाद ३६ अशी होती.
प्लेइंग-11
श्रीलंका: पथुम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), धनंजया डी सिल्वा, दनुष्का गुनाथिलका, भानुका राजपक्षे, दासुन शनाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमिरा, प्रमोद मदुशन, महेश थिक्सना.
नामिबिया: स्टीफन बायर्ड, डेव्हिड विसे, गेरहार्ड इरास्मस (सी), निकोल लॉफ्टी ईटन, जेजे स्मित, जॉन फ्रीलिंक, जेन ग्रीन (सी), दिवान ला कॉक, मायकेल व्हॅन लिंजेन, बर्नार्ड स्कोल्ट्ज, बेन शिकोंगो.