ETV Bharat / sports

T-20 World Cup: आर. अश्विनचे भारतीय टी-20 संघात प्रदीर्घ काळानंतर पुनरागमन - ashwin

टी-20 विश्वकरंडक यंदा ओमान आणि यूएईमध्ये होणार आहे. या स्पर्धेसाठी बुधवारी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. यात भारतीय संघाचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विनची प्रदीर्घ काळानंतर भारतीय टी-20 संघात पुनरागमन झाले आहे.

t20-world-cup-ravichandran-ashwin-returns-to-t20-team-after-a-long-time
T-20 World Cup: आर. अश्विनचे भारतीय टी-20 संघात प्रदीर्घ काळानंतर पुनरागमन
author img

By

Published : Sep 9, 2021, 5:10 PM IST

मुंबई - आगामी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. बुधवारी रात्री बीसीसीआयने 18 सदस्यीय संघ निवडला. यात तीन खेळाडू राखीव म्हणून निवडण्यात आले आहेत. दरम्यान, भारतीय संघात आर. अश्विनला मोठ्या गॅपनंतर संधी मिळाली आहे.

आयसीसी कसोटी गोलंदाजी क्रमवारीत आर. अश्विन दुसऱ्या स्थानावर आहे. परंतु त्याला इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यातील पहिल्या चार सामन्यात अंतिम संघात खेळण्याची संधी मिळालेली नव्हती. यामुळे भारताच्या अनेक माजी खेळाडूंनी तसेच जाणकारांनी आश्चर्य व्यक्त केलं. पण त्याची टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. यावरून तो किती महत्वाचा खेळाडू आहे, हे स्पष्ट होते.

आर. अश्विन याने 12 जून 2010 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यातून टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. यानंतर तो अखेरचा टी-20 सामना 2017 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. त्याला 2017 नंतर भारतीय संघात स्थान मिळाले नव्हते. आता 4 वर्षानंतर त्याची भारतीय टी-20 संघात निवड झाली आहे.

आर. अश्विन याने भलेही मागील चार वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टी-20 सामना खेळला नाही. परंतु त्याने आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी करत आपली छाप सोडली आहे. त्याने 159 आयपीएल सामन्यात 27.68 च्या सरासरीने 139 गडी बाद केले आहेत. याशिवाय त्याच्या नावे 46 टी-20 सामन्यात 22.94 च्या सरासरीने 52 विकेट आहेत.

अश्विनचा अनुभव भारतासाठी टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत फायद्याचा ठरू शकतो. दरम्यान, भारताने टी-20 विश्वकरंडक 2007 मध्ये जिंकला होता. यानंतर भारताला ही स्पर्धा जिंकता आलेली नाही. यंदा भारताला टी-20 विश्वकरंडक जिंकण्याची नामी संधी आहे.

हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीकडे मोठी जबाबदारी, BCCI ची घोषणा

हेही वाचा - टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा, पाहा कोणाला मिळाली संधी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.