मुंबई - महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेचा तिसरा हंगाम पुन्हा एकदा सुरू होत आहे. क्रिकेटच्या चाहत्यांना जगभरातील अव्वल क्रिकेटपटूंची कामगिरी पाहता येणार आहे. ही स्पर्धा उद्यापासून म्हणजे ४ नोव्हेंबरपासून शारजाह मैदानावर खेळवली जाईल.
कोरोनामुळे झालेल्या ब्रेकनंतर भारतीय महिला क्रिकेटमधील ही पहिली स्पर्धा आहे. महिलांच्या टी-२० चॅलेंजचा अंतिम सामना ९ नोव्हेंबरला होणार आहे. भारताची स्टार महिला खेळाडू स्मृती मंधानाकडे ट्रेलब्लेझर्स संघाची कमान असेल. तर, मिताली राज व्हेलोसिटी संघाचे नेतृत्त्व करेल. गतविजेत्या सुपरनोव्हाज संघाचे कर्णधारपद हरमनप्रीत कौरकडे आहे. सलग दोन वेळा महिला चॅलेंज स्पर्धेचे विजेतेपद मिळवणाऱ्या सुपरनोव्हाजला यंदा जेतेपदाची हॅट्ट्रिक साधण्याची सुवर्णसंधी आहे.
स्पर्धेतील संघ सुपरनोव्हाज, व्हेलोसिटी आणि ट्रेलब्लेझर्स एकमेकांशी एकदा सामना खेळतील. त्यानंतर अंतिम सामना खेळवला जाईल. आयपीएलच्या प्लेऑफचे सामने दुबई आणि अबुधाबी येथे खेळले जातील. तर महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा शारजाह येथे खेळवली जाईल.
महिला टी-२० चॅलेंज स्पर्धेचे वेळापत्रक -
- ४ नोव्हेंबर - सुपरनोव्हाज वि. व्हेलोसिटी - सायं. ७.३० वा.
- ५ नोव्हेंबर - व्हेलोसिटी वि. ट्रेलब्लेझर्स - दु. ३.३० वा.
- ७ नोव्हेंबर - सुपरनोव्हाज वि. ट्रेलब्लेझर्स - सायं. ७.३० वा.
- ९ नोव्हेंबर - अंतिम सामना - सायं. ७.३० वा.
संघ -
सुपरनोव्हाज - हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमा रॉड्रिग्स (उपकर्णधार), चमारी अटापट्टू, प्रिया पुनिया, अनुजा पाटील, राधा यादव, तान्या भाटिया (यष्टीरक्षक), शशिकला सिरीडिन, पूनम यादव, शकीरा सेल्मन, अरुंधती रेड्डी, पूजा वस्त्राकर, आयुषी सोनी, आयबोंगा खाका, मुस्कान मलिक.
ट्रेलब्लेझर्स - स्मृती मंधाना (कर्णधार), दीप्ती शर्मा (उपकर्णधार), पूनम राऊत, ऋचा घोष, डी. हेमलता, नुजहत परवीन (यष्टीरक्षक), राजेश्वरी गायकवाड, हर्लीन देओल, झुलन गोस्वामी, सिमरन दिल बहादूर, सलमा खातून, सोफी, नथकाना, डिएन्ड्रा डोडिन, काश्वी गौतम.
व्हेलोसिटी - मिताली राज (कर्णधार), वेदा कृष्णमूर्ती (उपकर्णधार), शेफाली वर्मा, सुषमा वर्मा (यष्टीरक्षक), एकता बिष्ट, मानसी जोशी, शिखा पांडे, देविका वैद्य, सुश्री दिव्यदर्शनी, मनाली दक्षिणी, लेग कास्पेरेक, डॅनिएला वॉट, जहांराम आलम, एम. अनघा.