कराची - पाकिस्तानची टी-२० स्पर्धा पाकिस्तान सुपर लीगमध्ये (पीएसएल) कोरोनाची प्रकरणे आढळली. त्यानंतर ही लीग स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळात (पीसीबी) कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पीसीबीतील एक वरिष्ठ अधिकारी कोरोनाच्या कचाट्यात सापडला असून या घटनेनंतर पीसीबीने आपली कार्यालये बंद केली आहेत. पीसीबीचे कर्मचारी आता घरातून आपली कामे करणार आहेत.
सहा क्रिकेटपटू आणि सहयोगी स्टाफ सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर पीसीबीला पाकिस्तान सुपर लीग पुढे ढकलावी लागली. या घटनेनंतर पीएसएलमधील कोराना नियंत्रणाच्या सुविधेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) एका निवेदनात म्हटले आहे की, संघ मालकांशी होणारी बैठक आणि सर्व सहभागींचे आरोग्य लक्षात घेऊन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान सुपर लीग तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे.
खेळाडूंचे त्यांच्या सुरक्षित ठिकाणी पोहोचणे, हे मंडळाचे प्राधान्य असल्याचे वसीम खान यांनी सांगितले. आतापर्यंत ३४ सामन्यांच्या स्पर्धेचे केवळ १४ सामने झाले आहेत.
हेही वाचा - 'विराट, रोहित आहेत परंतु पंत सारखा खेळाडू मी अजूनपर्यंत पहिला नाही'