ETV Bharat / sports

टी-20 विश्वचषक : भारत-पाकिस्तान सामन्याला ग्रहण, राऊत-ओवैसींसह या नेत्यांचा विरोध - टी-20 वर्ल्ड कप

24 ऑक्टोंबरला भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना रंगणार आहे. या सामन्याची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र त्यादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. त्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये होणारा हा सामना रद्द करा, अशी मागणी भाजपा नेते गिरिराज सिंह, तारकिशोर प्रसाद असदुद्दीन ओवैसी आणि संजय राऊत यांनी केली आहे.

टी-20 विश्वचषक
टी-20 विश्वचषक
author img

By

Published : Oct 19, 2021, 12:41 PM IST

Updated : Oct 27, 2021, 6:59 AM IST

मुंबई - यूएईमध्ये सुरू झालेल्या टी-20 विश्वकरंडकात 24 ऑक्टोंबरला भारत-पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामना रंगणार आहे. या सामन्याची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र त्यादरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. दहशतवादी तेथील नागरिकांना लक्ष्य करत आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानमध्ये होणारा हा सामना रद्द करा, अशी मागणी भाजपा नेते गिरिराज सिंह, तारकिशोर प्रसाद यांनी केली. तर आता हीच मागणी असदुद्दीन ओवैसी आणि संजय राऊत यांनी देखील केली आहे. तर बीसीसीआयने सामना रद्द करण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

असदुद्दीन ओवैसी म्हणाले -

एएनआय वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार, ऑल इंडिया मजलिस-ए- इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले की, जम्मू काश्मीरमध्ये आपल्या सैनिकांवर हल्ले करण्यात आले. त्यात अनेक जवान हुतात्मा झाले. तसेच स्थानिकांना देखील दहशतनाद्यांकडून लक्ष्य करण्यात येत आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी याविषयी चकार शब्द देखील काढत नाही. आणि अशात पाकिस्तानसोबत भारताचा सामना होणार आहे. त्यामुळे या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन 24 ऑक्टोंबरला होणारा भारत-पाकिस्तानमधील होणारा सामना रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गिरिराज सिंह म्हणाले -

भारत आणि पाकिस्तानमधील संबंध चांगले नसल्यास याचा पुनर्विचार केला पाहिजे. जम्मू-काश्मीरमधील हत्यांच्या पार्श्वभूमीवर भारत-पाकिस्तान सामना व्हायला हवा का, असे विचारल्यावर सिंह म्हणाले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 24 ऑक्टोबर रोजी दुबईमध्ये लढत होईल, कारण भारताची नजर विश्वचषकावर पुन्हा हक्क गाजवण्यावर आहे.

संजय राऊत म्हणाले -

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, "आम्ही नेहमीच असे म्हटले आहे की पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवू नका. आमचे लोक मारले जात आहेत आणि तुम्ही क्रिकेटबद्दल बोलत आहात". संघर्षादरम्यान भारत -पाक क्रिकेट सामन्यांना विरोध करण्यात सेना आघाडीवर आहे. शिवसेनेनं 1991 मध्ये मुंबईची वानखेडेची खेळपट्टी खोदली, 1999 मध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला आणि 2003 मध्ये उत्तर प्रदेशच्या आग्रामध्ये अशीच पुनरावृत्ती करण्यात आली होती.

बीसीसीआयचे स्पष्टीकरण -

आंतरराष्ट्रीय करारानुसार भारत-पाकिस्तानमधील सामना रद्द करणे शक्य नाही. यासंदर्भात आयसीसीने देखील करार केला आहे. त्यामुळे 24 ऑक्टोंबरचा सामना रद्द होणार नसून तो खेळला जाणार असल्याचे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी स्पष्ट केले आहे.

Last Updated : Oct 27, 2021, 6:59 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.