ETV Bharat / sports

Ind Vs Zim : सूर्यकुमार यादवने हजार धावा पूर्ण करत रचला इतिहास - केएल राहुल

भारतीय फलंदाज सूर्यकुमार (Suryakumar Yadav) यादवने रविवारी झिम्बाब्वे विरुद्ध टी-20 विश्वचषक 2022 च्या 42 व्या सामन्यात मोठी कामगिरी केली. ही कामगिरी करण्यासाठी त्याला 35 धावांची गरज होती जी त्याने सहज पार केली.

Suryakumar Yadav
सूर्यकुमार यादव
author img

By

Published : Nov 6, 2022, 5:14 PM IST

नवी दिल्ली: मेलबर्नमध्ये भारत आणि झिम्बाब्वे (India Vs Zimbabwe) यांच्यात टी-20 विश्वचषकाचा 42 वा सामना खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुपर-12 फेरीतील हा शेवटचा सामना आहे. भारताने झिम्बाब्वेसमोर 187 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. केएल राहुलने (K. L. Rahul) सुरूवातीला तर सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) अखेरपर्यंत चांगली खेळी केली. दोघांनी अर्धशतके झळकावली. राहुलने 35 चेंडूत 51 धावा केल्या. त्याचबरोबर सूर्यकुमारने 25 चेंडूत 61 धावांची नाबाद खेळी खेळली.

सूर्यकुमार यादवने रचला इतिहास: या दरम्यान सूर्यकुमार यादवने इतिहास रचला. सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 1000 T20 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. सूर्याला हे स्थान गाठण्यासाठी 25 धावांची गरज होती, जी त्याने झिम्बाब्वेविरुद्ध सहज केली. सूर्यकुमारच्या आधी मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) हा एकमेव फलंदाज आहे ज्याने एका वर्षात (2021 मध्ये 1326 धावा) ही कामगिरी केली आहे. सूर्यकुमार यादव आता T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात 1000 धावा करणारा भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी एका वर्षात भारतासाठी असा पराक्रम इतर कोणत्याही फलंदाजाने केला नव्हता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.