मुंबई - भारतीय संघाचा माजी डावखूरा फलंदाज सुरेश रैना सद्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आहे. डावखूरा फलंदाज रैनाला तामिळनाडूमध्ये सुरू असलेल्या तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेच्या उद्धाटन सामन्यात कॉमेंट्री करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यात रैनाने हे वक्तव्य केले आहे.
काय आहे सुरेश रैनाचे वक्तव्य -
सोमवारी पार पडलेल्या या सामन्यादरम्यान, कॉमेंट्री करताना सहकारी कॉमेंट्रीटरने रैनाला विचारले की, तु कशाप्रकारे दक्षिण भारतीय संस्कृतीला जवळ केलंस यावर सुरेश रैना म्हणाला, मी एक ब्राम्हण आहे. अनिरुद्ध श्रीकांत, एस बद्रीनाथ, लक्ष्मीपती बालाजी सोबत खेळलो आहे. यात आम्ही काही गोष्टी शिकल्या. टीम मॅनेजमेंटची साथ आहे. मला चेन्नईच्या संस्कृतीविषयी प्रेम आहे. मी भाग्यशाली आहे की, मी चेन्नई सुपर किंग्ज संघात खेळलो आहे मला आशा आहे की आणखी सामने खेळेन.
दरम्यान सुरेश रैनाने स्वत:ची जात उघड सांगितल्याने नेटीझन्सनी त्याला टारगेट केले. एकाने तर सुरेश रैनाला लाज वाटली पाहिजे, असे म्हटलं आहे. सुरेश रैना या वक्तव्यामुळे ट्विटवर ट्रेंड होत आहे.
किर्ती आझाद यांची सुरेश रैनाला साथ -
भारताचे माजी यष्टीरक्षक फलंदाज किर्ती आझाद यांनी सुरेश रैनाला साथ दिली आहे. त्यांनी ट्रोलर्संना मी पण एक ब्राम्हण आहे, यात काय अडचण आहे, असे म्हटलं आहे.
सुरेश रैनाने भारतासाठी 226 एकदिवसीय सामने खेळली आहेत. यात त्याने 35.31 च्या सरासरीने 5 हजार 615 धावा केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये रैनाच्या नावे 5 शतक आणि 36 अर्धशतके आहेत. टी-20 प्रकारात रैनाच्या नावे 1605 धावा असून यात एक शतक आहे. याशिवाय रैनाने 18 कसोटी सामन्यात 1 शतकासह 768 धावा केल्या आहेत.
हेही वाचा - IND vs ENG : भारतीय क्रिकेटरचे दुखापतीमुळे कसोटी पदार्पणाचे स्वप्न भंगले
हेही वाचा - IND vs ENG : भारतीय संघाला जबर धक्का; आवेश खाननंतर आणखी एका खेळाडूला दुखापत