मुंबई - भारताचा माजी फलंदाज सुरेश रैनाने मंगळवारी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. यापूर्वी १५ ऑगस्ट २०२० रोजी रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. रैना एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2011 च्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. आगामी देशांतर्गत हंगामात सुरेश रैना उत्तर प्रदेशकडून खेळणार नाही.
निवृत्तीची घोषणा करताना रैनाने ट्विट केले की, "माझ्या देशाचे आणि राज्याचे उत्तर प्रदेशचे प्रतिनिधीत्व करणे माझ्यासाठी अत्यंत सन्मानाची गोष्ट आहे. मी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून माझी निवृत्ती जाहीर करू इच्छितो. मी बीसीसीआय व उत्तर प्रदेश क्रिकेट असोशिएनचे आभार मानतो. चेन्नई आयपीएल, राजीव शुक्ला सर आणि माझ्या सर्व चाहत्यांचा पाठिंबा आणि माझ्या क्षमतेवर अढळ विश्वास."
13 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत रैनाने 18 कसोटी, 226 एकदिवसीय आणि 78 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. रैनाने भारतासाठी 226 एकदिवसीय सामन्यांमध्ये 5615 धावा आणि 78 टी-20 सामन्यांमध्ये 1605 धावा केल्या. कसोटीत पदार्पणात शतक झळकावणारा रैना क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा पहिला भारतीय आहे आणि त्याची शतके भारताबाहेर झळकली आहेत.
इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळताना सुरेश रैनाच्या नावावर 205 IPL सामन्यात 39 अर्धशतके आणि 136.76 च्या स्ट्राईक रेटने 5528 धावा आहेत.
हेही वाचा - IND vs PAK: भारत पाक सामन्यात उर्वशी रौतेला हजर मीम्सचा पाऊस