मुंबई : सुनील गावस्कर यांच्या आई मीनल गावस्कर या 95 वर्षांच्या होत्या. मुंबईतच त्यांचे निधन झाले. रविवारी सकाळी वृद्धापकाळाशी संबंधित आजारांमुळे निधन झाले. मात्र, भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या (2nd Test between India and Bangladesh) चौथ्या दिवशीही गावसकर यांनी आपली समालोचन सुरू ठेवत आपले कर्तव्य बजावले होते. गेल्या काही दिवसांपासून मीनल गावस्कर यांची तब्बेत बरी नव्हती. याच कारणामुळे गावस्कर हे आयपीएलच्या गेल्या मोसमात समालोचनासाठी उपस्थित नव्हते. आईची काळजी घेण्यासाठी घरी परतले होते. मात्र, रविवारी गावस्कर बांग्लादेशमध्ये असताना त्यांच्या आईचे निधन झाले. बांगलादेश विरुद्ध भारत कसोटी सामना चार दिवसात संपल्यानंतर गावस्कर आपल्या आईच्या अंतिम संस्कारासाठी भारतात परतणार (Will return to India for mothers last rites) असल्याचे समजते.
सुनील गावस्कर यांचा रेकॉर्ड : माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर हे भारताच्या महान खेळाडूंपैकी एक आहे. १९८३ ची विश्वचषक स्पर्धा जिंकण्यात त्यांचा मोलाचा वाटा होतो. गावस्कर यांची कारकीर्द १९७१ ते १९८७ अशी होती. यादरम्यान त्यांनी १२५ कसोटींमध्ये ३४ शतकांसह १०,१२५ धावा केल्या. तसेच, त्यांनी भारतासाठी १०८ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात ३,०९२ धावा केल्या आहेत.