ETV Bharat / sports

IPL 2022: 'असा' राहिला आहे मुंबईचा युवा खेळाडू तिलक वर्माचा प्रेरणादायी प्रवास... - तिलक वर्माची कहाणी

तिलक वर्माचे वडील नंबुरी नागाराजू ( Tilak Verma father Namburi Nagaraju ) हे इलेक्ट्रिशियन आहेत. ते आपल्या मुलाचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही. अशा परिस्थितीत एक प्रशिक्षक पुढे येतो आणि सर्व खर्च उचलतो. या 19 वर्षीय मुलाने लिस्ट ए आणि टी-20 क्रिकेटमध्ये मिळालेल्या मर्यादित संधींचा फायदा घेतला आणि आता आयपीएलची पाळी आहे.

Tilak Verma
Tilak Verma
author img

By

Published : Mar 27, 2022, 5:35 PM IST

Updated : Mar 27, 2022, 11:02 PM IST

नवी दिल्ली: एका सामान्य कुटुंबापासून ते रातोरात स्टार म्हणून चर्चेत येण्यापर्यंत, मुंबई इंडियन्सच्या नवख्या तरुण तिलक वर्माची कहाणी ( The story of Tilak Verma ) खरोखरच प्रेरणादायी आहे. हैदराबादमध्ये इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे वर्माचे वडील नंबुरी नागाराजू यांना आपल्या मुलाचे क्रिकेट प्रशिक्षण चालू ठेवणे परवडणारे नव्हते. त्यामुळे त्याचे प्रशिक्षक सलाम बायश यांनी त्याचा सर्व खर्च उचलला. त्याला योग्य प्रशिक्षण दिले आणि त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्याला क्रिकेटचे सर्व साहित्यही दिले.

एक युवा क्रिकेटपटू म्हणून वर्माला ( Young cricketer Tilak Verma ) स्टेजवर पोहोचण्यापूर्वी अनेक अडचणींचा सामना करावा लागला, परंतु देशातील काही आयपीएल फ्रँचायझी त्याला आपल्या संघात घेण्यासाठी रांगेत उभ्या होत्या. आयपीएल मेगा लिलावामध्ये 19 वर्षीय खेळाडूचे नाव अनकॅप्ड खेळाडूंच्या यादीत होते. तसेच मुंबई इंडियन्सला त्याला आपल्या संघात 1.7 कोटी रुपयांमध्ये घेण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सशी स्पर्धा करावी लागली. वर्माला त्याच्या मूळ किंमतीच्या 8.5 पट अधिक बोली लागली. कारण त्याची बोली 20 लाख रुपयांपासून सुरू झाली होती. तेव्हापासून तो क्रिकेटविश्वात चर्चेचा विषय राहिला आहे.

या बातमीबद्दल त्याच्या पालकांच्या पहिल्या प्रतिक्रियेबद्दल विचारले असता वर्माने आयएएनएसला सांगितले की, “मुंबई इंडियन्ससाठी माझी निवड ( Selection for Mumbai Indians ) होताच मी माझ्या पालकांना व्हिडिओ कॉल केला. त्यांना खूप आनंद झाला, पण ते काही बोलू शकले नाहीत. पप्पा बोलू शकत नव्हते. मी म्हणालो की माझी मुंबई इंडियन्ससाठी निवड झाली आहे. मला काय बोलावं तेही कळत नव्हतं! मग मी म्हणालो कि मी फोन ठेवत आहे. तो माझ्या आयुष्यातील सर्वात भावनिक क्षण होता. एमआयकडून निवड झाल्याची बातमी मिळाल्याबद्दल त्यांच्या भावनांबद्दल विचारले असता वर्मा म्हणाला की, ही एक वेगळी भावना होती.

वर्मा पुढे म्हणाला, जेव्हा लिलावासाठी माझ्या नावाची घोषणा केली गेली, तेव्हा मी माझ्या कोचसोबत व्हिडिओ कॉलवर होतो. जेव्हा एमआयने माझ्यासाठी बोली लावली. तेव्हा मी माझ्या भावना व्यक्त करू शकत नाही. मी लहानपणापासून एमआयचे कौतुक केले आहे. हे घडले तेव्हा मी माझ्या रणजी संघासोबत होतो. ही बातमी ऐकून माझे सर्व मित्र खूप खुश झाले आणि नाचू लागले.

या वर्षाच्या सुरुवातीला अंडर-19 एकदिवसीय विश्वचषक ( Under-19 ODI World Cup ) जिंकलेल्या विजयी भारतीय संघाचा भाग असलेल्या, हैदराबादच्या क्रिकेटपटूने त्याचे सुरुवातीचे दिवस आठवले. जेव्हा त्याला मूलभूत गोष्टींसाठी मिळवण्याठी वाट बघावी लागत होती. तो म्हणाला, मी तुटलेल्या बॅटने खेळत राहिलो. तुटलेल्या बॅटने मी अंडर-16 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या. जेव्हा माझ्या प्रशिक्षकाने हे पाहिले तेव्हा त्यांनी मला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी विकत घेऊन दिल्या. मी आज जो काही आहे ते माझ्या प्रशिक्षक सरांमुळे आहे.

Last Updated : Mar 27, 2022, 11:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.