ETV Bharat / sports

Sachin Tendulkar 49th Birthday : 49 व्या वाढदिवसानिमित्त सचिन तेंडुलकरवर सोशल मीडियावरुन शुभेच्छांचा वर्षाव - सचिनचा 49 वा वाढदिवस

भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 49 वा वाढदिवस आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरवर आजी-माजी क्रिकेटर आणि इतर मान्यवर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

Sachin Tendulkar
Sachin Tendulkar
author img

By

Published : Apr 24, 2022, 6:40 PM IST

भारताचा माजी खेळाडू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा ( Master blaster Sachin Tendulkar ) आज 49 वा वाढदिवस आहे. सचिन तेंडुलकरला क्रिकेटचा देव या नावाने देखील ओळखले जाते. 2013 मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही या दिग्गजाची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही. आजही त्यांच्या नुसत्या उपस्थितीने स्टेडियममध्ये ‘सचिन-सचिन’चा आवाज घुमतो. सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत अनेक विक्रम केले आणि यातील काही विक्रम मोडणे जवळपास अशक्य आहेत.

  • 6⃣6⃣4⃣ international matches
    3⃣4⃣,3⃣5⃣7⃣ international runs
    1⃣0⃣0⃣ international tons
    2⃣0⃣1⃣ international wickets

    Here's wishing the ever-so-inspirational & legendary @sachin_rt a very happy birthday. 🎂 👏 🙌 #TeamIndia pic.twitter.com/d70JoSnJd8

    — BCCI (@BCCI) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सचिनचे क्रिकेट क्षेत्रातील योगदान शब्दात वर्णन करता येणार नाही. कारण काही खेळाडूंचा प्रभाव असा असतो की, आपण कधीही त्यांच्या योगादान मोजू शकत नाही. सचिन तेंडुलकरचे व्यक्तिमत्व असे आहे, ज्याचा भारतासह जगभरातील क्रिकेट दिग्गज आणि तरुण आदर करतात. सचिन तेंडुलकरचा जन्म 24 एप्रिल 1973 साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. सचिनचे संपूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर आहे. असा हा महान क्रिकेटर आज आपल्या 49 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्यावर आज सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सोशल मीडियाच्या माध्यमातून सचिन तेंडुलकरवर मोठ्या प्रमाणात शुभेच्छांचा वर्षाव -

भारतीय संघाचा आणि मुंबई इंडियन्स संघाचा युवा खेळाडू इशान किशनने सचिन तेंडुलकरा ट्विट करुन शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये तो म्हणाला, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सचिन तेंडुलकर पाजी, तुमच्या शब्दांसाठी आणि मार्गदर्शनासाठी सदैव आभारी आहे. तसेच एक फोटो शेअर केला आहे.

इरफान पठाने शुभेच्छा देताना लिहले, या चित्रात किंवा आयुष्यात तुम्ही आम्हाला नेहमीच मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिलीत आणि ती साध्य करण्याचा मार्गही दाखवला. पाजी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

  • In this picture or in life you have always led us to Dream big and also showed us the path to achieve it. Wishing you a very happy birthday Paji ⁦⁦@sachin_rtpic.twitter.com/KJXOiDwabn

    — Irfan Pathan (@IrfanPathan) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राशिद खानने शुभेच्छा देताना लिहले, सचिन तेंडुलकर सर तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! तुमचा दिवस छान जावो आणि वर्ष आणखी चांगले जाईल अशी आशा करतो.

मोहम्मद कैफने शुभेच्छा देताना लिहले, 24 एप्रिल हा राष्ट्रीय क्रिकेट दिवस म्हणून क घोषित करावा. सचिन पाजीसारखा खेळाच्याप्रती वेडा असलेला माणूस मी आजवर पाहिला नाही. भारताच्या क्रिकेटवरील अखंड प्रेमात मोठी भूमिका बजावणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • How about declaring April 24 as National Cricket Day. I have never seen anybody so madly in love with the game like Sachin Paaji. Happy Birthday to the man who played a big role in India's amar prem with cricket. ⁦@sachin_rtpic.twitter.com/kMXZYCrxhf

    — Mohammad Kaif (@MohammadKaif) April 24, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विरेंद्र सेहवागने देखील आपल्या मित्राला एका वेगळ्या अंदाजात शुभेच्या दिल्या आहेत. ज्यामध्ये त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.

हेही वाचा -Sachin Tendulkar's 49th Birthday : मुंबईतल्या सनी काजळेने साठवला हजारो बातम्यांमधील सचिन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.