न्यूझीलंड : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज महिला ( Indian women v West Indies women ) संघात आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकाचा सराव सामना पार पडला. हा सामना मंगळवारी खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने स्मृती मंधानाच्या 67 चेंडूत 66 धावांच्या ( Smriti Mandhana played a half century ) खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजचा 81 धावांनी पराभव केला.
-
#TeamIndia post 258/10 on the board against West Indies in their #CWC22 warm-up game. #INDWvWIW
— BCCI Women (@BCCIWomen) March 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
6⃣6⃣ for @mandhana_smriti
5⃣1⃣ for @Deepti_Sharma06
4⃣2⃣ for @YastikaBhatia
Over to our bowlers now. 👍 👍
📸 📸: ICC/Getty Images pic.twitter.com/qGgWYMzkXF
">#TeamIndia post 258/10 on the board against West Indies in their #CWC22 warm-up game. #INDWvWIW
— BCCI Women (@BCCIWomen) March 1, 2022
6⃣6⃣ for @mandhana_smriti
5⃣1⃣ for @Deepti_Sharma06
4⃣2⃣ for @YastikaBhatia
Over to our bowlers now. 👍 👍
📸 📸: ICC/Getty Images pic.twitter.com/qGgWYMzkXF#TeamIndia post 258/10 on the board against West Indies in their #CWC22 warm-up game. #INDWvWIW
— BCCI Women (@BCCIWomen) March 1, 2022
6⃣6⃣ for @mandhana_smriti
5⃣1⃣ for @Deepti_Sharma06
4⃣2⃣ for @YastikaBhatia
Over to our bowlers now. 👍 👍
📸 📸: ICC/Getty Images pic.twitter.com/qGgWYMzkXF
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित 50 षटकांत 258 धावा केल्या होत्या. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला विजयासाठी 259 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित 50 षटकांत 9 फलंदाज गमावून केवळ 177 धावा करु शकला. त्यामुळे त्यांना 81 धावांनी भारताकडून पराभव स्वीकारावा ( West Indies lost by 81 runs ) लागला.
प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने शानदार फलंदाजी केली. ज्यामध्ये स्मृती मंधानाने 66 धावांच्या महत्वपूर्ण योगदान दिले. त्याचबरोबर दीप्ति शर्मा 51, मिताली राज 30 आणि यास्तिका भाटिया 42 ( Yastika Bhatia 42 runs ) यांनी धावांचे योगदान दिले. त्याचबरोबर वेस्ट इंडिजकडून गोलंदाजी करताना हेली मॅथ्यूज 2(47) आणि चेरी-एन फ्रेजर 2(24) यांनी शानदार गोलंदाजी करताना सर्वाधिक विकेट्स घेतल्या.
-
A solid show with the bat 👍
— BCCI Women (@BCCIWomen) March 1, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
An impressive display with the ball 💪#TeamIndia beat West Indies by 81 runs in the #CWC22 warm-up game. 👏 👏 #INDWvWIW
📸 📸: ICC/Getty Images pic.twitter.com/aMlGYVyNYJ
">A solid show with the bat 👍
— BCCI Women (@BCCIWomen) March 1, 2022
An impressive display with the ball 💪#TeamIndia beat West Indies by 81 runs in the #CWC22 warm-up game. 👏 👏 #INDWvWIW
📸 📸: ICC/Getty Images pic.twitter.com/aMlGYVyNYJA solid show with the bat 👍
— BCCI Women (@BCCIWomen) March 1, 2022
An impressive display with the ball 💪#TeamIndia beat West Indies by 81 runs in the #CWC22 warm-up game. 👏 👏 #INDWvWIW
📸 📸: ICC/Getty Images pic.twitter.com/aMlGYVyNYJ
धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाकडून हेली मॅथ्यूजने 44 धावांची खेळी ( Lee Mathews scored 44 runs ) केली. त्याचबरोबर शेमेन कँपबेलने सर्वाधिक 63 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले.परंतु ती संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. कारण इतर फलंदाजांनी खराब फलंदाजी केली. भारतातकडून गोलंदाजी करताना पूजा वस्त्रकार 3(21), मेघना सिंह 2(30), राजेश्वरी गायकवाड 2(39) आणि दीप्ति शर्माने 2(31) विकेट्स घेतल्या.
संक्षिप्त धावफलक :
भारतीय महिला संघ 50 षटकांत 258 (स्मृती मानधना 66, दीप्ती शर्मा 51, मिताली राज 30, यास्तिका भाटिया 42, हेली मॅथ्यूज 2/47, चेरी-अॅन फ्रेझर 2/24)
वेस्ट इंडिज महिला संघ 50 षटकांत 177/9 (हेली मॅथ्यूज 44, शेमन कॅम्पबेल 63, पूजा वस्त्राकर 3/21, मेघना सिंग 2/30, राजेश्वरी गायकवाड 2/39, दीप्ती शर्मा 2/31)