कटक: अक्षर पटेलला दिनेश कार्तिकच्या अगोदर फलंदाजीसाठी पाठवणे विचित्र वाटू शकते, परंतु आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यरने ( Batsman Shreyas Iyer ) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात घेतलेल्या निर्णयाचा बचाव करताना म्हणाला की, दोन धावा (स्ट्राइक रोटेट करण्यसाठी) चोरण्यासाठी परिस्थीती बघून हे असे केले.
ही रणनीती कामी आली नाही आणि अक्षराला ( Batsman Axar Patel ) धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला. 17व्या षटकात तो बाद झाल्याने भारताची धावसंख्या 6 बाद 112 अशी झाली. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कार्तिकच्या नाबाद 30 धावांमुळे भारताला सहा बाद 148 धावांपर्यंत मजल मारता आली.
-
South Africa win the 2nd T20I by 4 wickets and are now 2-0 up in the five match series.
— BCCI (@BCCI) June 12, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Scorecard - https://t.co/pkuUUB966c #INDvSA @Paytm pic.twitter.com/fwlCeXouOM
">South Africa win the 2nd T20I by 4 wickets and are now 2-0 up in the five match series.
— BCCI (@BCCI) June 12, 2022
Scorecard - https://t.co/pkuUUB966c #INDvSA @Paytm pic.twitter.com/fwlCeXouOMSouth Africa win the 2nd T20I by 4 wickets and are now 2-0 up in the five match series.
— BCCI (@BCCI) June 12, 2022
Scorecard - https://t.co/pkuUUB966c #INDvSA @Paytm pic.twitter.com/fwlCeXouOM
सामन्यानंतर श्रेयसने पत्रकारांना सांगितले की, आम्ही यापूर्वीही अशी रणनीती अवलंबली होती. अक्षर क्रीजवर उतरला तेव्हा आमच्याकडे सात षटके शिल्लक होती. तो एक-दोन धावा घेऊन स्ट्राइक रोटेट करू शकतो. तो म्हणाला, याशिवाय, नंतर कोणालाही क्रीजवर फटके मारण्याची आणि पहिल्या चेंडूवर फटके मारण्याची गरज नव्हती. डीके (कार्तिक) असे करू शकतो, परंतु 15 षटकांनंतर तो आमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरला आहे, जिथे तो क्रीजवर उतरताच मोठे शॉट्स खेळू शकतो.
कार्तिकलाही ( Batsman Dinesh Karthik ) या विकेटवर धावा काढण्यासाठी संघर्ष करावा लागला, असा युक्तिवाद श्रेयसने केला. “सुरुवातीलाही त्याला (कार्तिक) धावा काढणे अवघड गेले. या सामन्यात विकेटचा मोठा वाटा होता. जोपर्यंत या रणनीतीचा संबंध आहे, आम्ही भविष्यात देखील त्याचा अवलंब करू.
कार्तिकला आधी पाठवले असते तर भारताला 160 हून अधिक धावा करता आल्या असत्या आणि शेवटी 12 धावा कमी पडल्याचं श्रेयसनेही मान्य केलं. तो म्हणाला, "तुम्ही सामना पाहिल्यास, मला वाटते की या विकेटवर 160 धावा काही दडपण आणण्यासाठी खरोखर चांगल्या होत्या, परंतु आम्ही त्यापेक्षा 12 धावांनी कमी होतो."
हेही वाचा - KIYG 2021 : आदिल अल्ताफने जम्मू-काश्मीरसाठी जिंकले पहिले सायकलिंग सुवर्णपदक