दुबई - आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. सर्व संघ या हंगामात चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहेत. अशा दिल्ली कॅपिटल्स संघात एका युवा स्फोटक फलंदाजांची वापसी झाली आहे. याविषयावरून दिल्ली कॅपिटल्सचा अनुभवी फलंदाज शिखर धवन याने प्रतिक्रिया दिली आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघात श्रेयस अय्यरची वापसी झाली आहे. याविषयावर बोलताना शिखर धवन म्हणाला की, श्रेयस अय्यरच्या वापसीमुळे संघ अधिक बळकट होईल. आम्ही आयपीएल 2021 उर्वरित हंगामाची सुरूवात शानदार करत पुढे जाण्याचा प्रयत्न करू.
श्रेयस अय्यरच्या वापसीने संघ आणखी बळकट झाला
आम्ही आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात शानदार लयीत होतो. पण स्पर्धा अचानक स्थगित करण्यात आली आणि ती लय तुटली. आता आम्हाला ती लय पुन्हा मिळवण्यासाठी कष्ठ घ्यावे लागतील. यात एक चांगली बाब ही आहे की, श्रेयस अय्यरची संघात वापसी झाली आहे. यामुळे संघ आणखी बळकट झाला आहे, असे देखील शिखर धवन म्हणाला.
श्रेयस अय्यर यूएईमध्ये दाखल
श्रेयस अय्यर दुखापतीमुळे आयपीएल 2021 च्या पहिल्या सत्रात खेळू शकला नव्हता. त्याला मार्च महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेत दुखापत झाली होती. आता अय्यर दुखापतीतून सावरला असून तो उर्वरित हंगामात खेळण्यासाठी यूएईमध्ये दाखल झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामात आपल्या अभियानाची सुरूवात 22 सप्टेंबर रोजी सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्याने करणार आहे.
हेही वाचा - IPL 2021 च्या उर्वरित हंगामाला सुरूवात होण्याआधीच इंग्लंडच्या 3 दिग्गज खेळाडूंची माघार
हेही वाचा - IPL 2021 : भारताच्या सर्व खेळाडूंचे अहवाल कोरोना निगेटिव्ह, खेळाडू यूएईला रवाना