ETV Bharat / sports

'श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार भुवी किंवा धवनला केलं जाऊ शकतं'

भारताचे माजी क्रिकेटर दीप दास गुप्ता यांनी भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याविषयी मोठं भाष्य केलं आहे.

shikhar-dhawan-and-bhuvneshwar-kumar-could-be-captain-of-indian-team-for-sri-lanka-tour
'श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार भुवी किंवा धवनला केलं जाऊ शकतं'
author img

By

Published : May 11, 2021, 5:04 PM IST

मुंबई - भारताचे माजी क्रिकेटर दीप दासगुप्ता यांनी भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याविषयी मोठं भाष्य केलं आहे. त्यांनी, श्रीलंका दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदाचे दावेदार शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमार हे दोघे असल्याचे म्हटलं आहे.

जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्याला भारताचे अनेक वरिष्ठ खेळाडू जाणार नाहीत. भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा या दौऱ्यासाठी उपलब्ध नाहीत. यामुळे संघाचे नेतृत्व कोणाकडे जाणार याची चर्चा रंगली आहे.

दीप दासगुप्ता यांनी एका क्रीडा माध्यमाशी बोलताना सांगितलं की, 'निश्चितच विराट कोहली, रोहित शर्मा आणि केएल राहुल या दौऱ्यासाठी उपलब्ध नाहीत. यामुळे कर्णधारपदासाठी संघातील सर्वात अनुभवी खेळाडू शिखर धवन एक पर्याय असू शकतो. मी शिखरचे नाव निश्चित घेतले आहे. परंतु, भुवनेश्वर कुमार जर फिट असला तर तो देखील दावेदार ठरू शकतो.'

दरम्यान, भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळणार आहे. या मालिका जुलै महिन्यात होणार आहेत. उभय संघातील एकदिवसीय मालिकेला १३ जुलैपासून सुरूवात होणार आहे. तर टी-२० मालिकची सुरूवात २२ जुलैपासून होणार आहे. भारतीय संघ तब्बल ३ वर्षानंतर श्रीलंकेचा दौरा करणार आहे.

हेही वाचा - भारतीय संघाचे श्रीलंका दौऱ्यातील सर्व सामने 'या' मैदानावर होणार

हेही वाचा - चहर आणि कौल यांनी टोचून घेतली कोरोना प्रतिबंधक लस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.