ETV Bharat / sports

Ravi Shastri Statement : बुमराह आणि जडेजा टी-20 संघात नसताना रवी शास्त्रींने केले मोठे वक्तव्य

भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Former head coach Ravi Shastri ) यांनी जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah ) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja ) यांना टी-20 विश्वचषकाच्या ( T20 World Cup 2022 ) संघातून वगळल्याबद्दल मोठी प्रतिक्रिया दिली आहे. जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे तर बुमराह पाठीच्या गंभीर समस्येने त्रस्त आहे.

Ravi Shastr
रवी शास्त्री
author img

By

Published : Oct 7, 2022, 4:17 PM IST

चेन्नई: टी-20 विश्वचषकात ( T20 World Cup 2022 ) जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja ) यांची उणीव संघाला भासणार असली, तरी नवा चॅम्पियन शोधण्यास मदत होईल, तसेच संधी मिळेल, असा विश्वास भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी व्यक्त ( Ravi Shastri Statement ) केला. बुमराह आणि जडेजा दुखापतींमुळे ऑस्ट्रेलियात या महिन्यात सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकाला मुकणार आहेत. जडेजाच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे तर बुमराह पाठीच्या गंभीर समस्येने त्रस्त आहे. या दोघांच्या दुखापतीमुळे भारताला मोठा धक्का बसला आहे.

"बुमराह नसेल, जडेजा नसेल आणि त्याचा संघावर परिणाम होईल पण त्याच वेळी नवीन चॅम्पियन शोधण्याची संधी देखील आहे," असे शास्त्री यांनी आपल्या 'कोचिंग बियॉन्ड' ( Coaching Beyond ) या नवीन उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी सांगितले. ते म्हणाले, बुमराहची दुखापत दुर्दैवी ( Jasprit Bumrahs injury ) आहे. खूप क्रिकेट खेळले जात आहे आणि खेळाडू जखमी होत आहेत. तो दुखापतग्रस्त आहे पण दुसऱ्यासाठी ही संधी आहे. दुखापत झाल्यास आपण काहीही करू शकत नाही.

बुमराहच्या जागी अद्याप कोणत्याही नवीन खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. परंतु मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Head coach Rahul Dravid ) यांनी संकेत दिले आहेत, की मोहम्मद शमी कोविड -19 मधून बरा झाल्यास आणि पूर्ण तंदुरुस्ती प्राप्त झाल्यास त्याला संघात समाविष्ट केले जाऊ शकते. टी-20 विश्वचषकासाठी भारतीय संघात स्टँडबाय म्हणून सामील करण्यात आलेल्या शमीने ( Mohammed Shami ) जुलैपासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळलेले नाही. पण ऑस्ट्रेलियात खेळण्याचा वेगवान गोलंदाजाचा अनुभव भारतासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास शास्त्रीला आहे.

गेल्या सहा वर्षात भारताने ऑस्ट्रेलियाचा खूप दौरे केले आहेत आणि तो संघाचा भाग देखील होता. म्हणूनच हा अनुभव महत्त्वाचा आहे. शास्त्री म्हणाले की, काही खेळाडूंना दुखापत झाली असली तरी भारतीय संघ खूप चांगला आहे. तो म्हणाला, मला वाटतं आमची टीम खूप चांगली आहे. उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली तर कोणताही संघ चॅम्पियन होऊ शकतो. म्हणूनच चांगल्या सुरुवातीवर लक्ष केंद्रित करणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा - Womens Asia Cup 2022, Indw Vs Pakw : आज भारत पाकिस्तान महामुकाबला, जाणून घ्या, केव्हा आणि कुठे पाहता येणार सामना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.