ढाका : बांगलादेशचा अव्वल अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन ( All-rounder Shakib Al Hasan ) याने "तणाव आणि थकवा" या कारणांमुळे काही दिवसांपूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतली होती. त्यानंतर शनिवारी या दौऱ्यासाठी स्वत:ला उपलब्ध घोषित केले आहे.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने ( Bangladesh Cricket Board ) शाकिबला 30 एप्रिल पर्यंत सर्व फॉरमॅट मधून विश्रांती दिली होती. त्यानंतर आता बीसीबी अध्यक्ष नजमुल हसन यांनी घोषणा केली आहे, कि शाकिब 18 मार्च पासून सेंचुरियन मध्ये आगामी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि सुरू होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी उपलब्ध असेल.
बीसीबी अध्यक्ष नजमुल हसन ( BCB President Nazmul Hasan ) म्हणाले, "शाकिब दक्षिण अफ्रिका दौऱ्यात सर्व फॉरमॅटसाटी उपलब्ध असणार आहे. तो उद्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी रवाना होणार आहे.
हसन म्हणाले, "वरिष्ठ खेळाडूंना खूप दडपण सहन करावे लागते. हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. 14 एकदिवसीय आणि 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांव्यतिरिक्त, आम्हाला यावर्षी आठ कसोटी खेळायच्या आहेत. या सर्व सामन्यांमध्ये आमच्या वरिष्ठ खेळाडूंना खेळणे अवघड आहे. हे आपण समजून घेतले पाहिजे.