ETV Bharat / sports

सहवाग, युवराज आणि हरभजन इंडिया महाराजा संघाचे प्रतिनिधित्व करणार - इंडिया महाराजा

एलएलसीचा पहिला सीझन ( first season of LLC ) हा निवृत्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंसाठी एक व्यावसायिक क्रिकेट लीग आहे. ज्यामध्ये तीन पॉवर-पॅक संघांचा समावेश आहे. हे सर्व सामने ओमानमधील अल अमेरत क्रिकेट स्टेडियममध्ये ( Al Amerat Cricket Stadium ) खेळले जाणार आहेत.

India Maharaja Team
इंडिया महाराजा संघ
author img

By

Published : Jan 4, 2022, 5:18 PM IST

नवी दिल्ली : लिजेंड्स लीग क्रिकेट ( legends league cricket ) ही स्पर्धा २० जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा तीन पॉवर-पॅक संघांमध्ये खेळली जाणार आहे. या स्पर्धेचे सामने ओमानमधील अल अमेरत क्रिकेट स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत. एलएलसी ही निवृत्त क्रिकेटपटूंची एक व्यावसायिक लीग ( LLC is a professional league of retired cricketers )आहे. ज्यामध्ये वीरेंद्र सेहवाग, युवराज सिंग आणि हरभजन सिंग हे अनेक माजी खेळाडू आहेत. जे या स्पर्धेत इंडिया महाराजा ( India Maharaja ) संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येतील.

लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेत इतर दोन संघ आशिया आणि जगभरातून असणार आहेत. वरील तिघांव्यतिरिक्त इरफान पठाण, युसूफ पठाण, बद्रीनाथ, आरपी सिंग, प्रग्यान ओझा, नमन ओझा, मनप्रीत गोनी, हेमांग बदानी, वेणुगोपाल राव, मुनाफ पटेल, संजय बांगर, नयन मोंगिया आणि अमित भंडारी हे देखील इंडिया महाराजा संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

ते खऱ्या राजांप्रमाणे येतील, ते पाहतील आणि जिंकतील. भारतातील क्रिकेट महाराज आशियातील आणि उर्वरित जगातील इतर दोन आघाडीच्या संघांविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येत आहेत, असे भारताचे माजी प्रशिक्षक आणि लिजेंड्स लीग क्रिकेटचे आयुक्त रवी शास्त्री ( Legends League Cricket Commissioner Ravi Shastri ) यांनी एका मीडिया रिलीझमध्ये म्हटले आहे.

सेहवाग, युवराज आणि भज्जी जेव्हा आफ्रिदी, मुरली, चामिंडा आणि शोएब यांच्याविरुद्ध खेळतील. तेव्हा या सर्व प्रतिस्पर्ध्यांचा सामना चाहत्यांसाठी भूतकाळातील धमाका असणार आहे, असेही ते पुढे म्हणाले.

आशिया लायन्स नावाच्या आशिया संघात पाकिस्तान आणि श्रीलंकेचे माजी ( Former Pakistan and Sri Lanka players in the Asia team ) दिग्गज शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी, सनथ जयसूर्या, मुथय्या मुरलीधरन, कामरान अकमल, चामिंडा वास, रोमेश कालुविथरना, तिलकरत्ने दिलशान, अझहर महमूद, उपुल थरंगा, मिसबाह-उल-- मोहम्मद हाफीज, शोएब मलिक, मोहम्मद युसूफ आणि उमर गुल असणार आहेत. अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असगर अफगाण हा देखील संघाचा भाग असेल. त्याचबरोबर तिसऱ्या संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची घोषणा अद्याप झालेली नाही.

हेही वाचा - IND vs SA 2nd Test Day 2 : द. आफ्रिकेच्या पहिल्या डावात 4 बाद 102 धावा, शार्दुल ठाकूरचे 3 बळी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.