ETV Bharat / sports

Rohit Sharma Tweet Viral : सूर्यकुमार यादव बाबतची रोहितची भविष्यवाणी ठरली खरी; 10 वर्षानंतर ट्विट होत आहे व्हायरल - सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादवने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 सामन्यात 117 धावांची शानदार ( Suryakumar Yadav century ) खेळी केली. त्यानंतर आता रोहित शर्माचे दहा वर्ष जुने ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Suryakumar Yadav
Suryakumar Yadav
author img

By

Published : Jul 11, 2022, 6:52 PM IST

नॉटिंगहॅम: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव भारतीय संघासाठी एक नवीन आशा म्हणून उदयास आला आहे. सूर्यकुमार यादवने ( Suryakumar Yadav ) रविवारी नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 117 धावांची शानदार खेळी खेळली. टीम इंडियाने भलेही हा सामना 17धावांनी गमावला असेल, पण सूर्याने आपल्या खेळीने भारतीय चाहत्यांची मनं नक्कीच जिंकली. त्याचबरोबर त्याने अनेक विक्रम सुद्ध प्रस्थापित केले आहे. तसेच सूर्यकुमार यादव बाबतचे रोहित शर्माचे 10 वर्षापूर्वीचे एक ट्विट आता जोरदार व्हायरल ( Rohit Sharma tweet goes viral ) होत आहे.

  • Just got done with BCCI awards here in chennai..some exciting cricketers coming up..Suryakumar yadav from Mumbai to watch out for in future!

    — Rohit Sharma (@ImRo45) December 10, 2011 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सूर्यकुमार यादवच्या टी-20 शतकानंतर ( Suryakumar Yadav T20 Cricket century ) भारताचा कर्णधार रोहित शर्माचे 10 वर्ष जुने ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 10 डिसेंबर 2011 रोजी रोहितने एक ट्विट केले होते. ज्यामध्ये त्याने लिहिले होते की, ''चेन्नईतील बीसीसीआय पुरस्कार सोहळा संपन्न झाला. काही महान क्रिकेटपटू येत आहेत. मुंबईचा सूर्यकुमार यादवही भविष्यात कमाल करू शकतो.'' यावरून रोहितला सूर्यकुमार यादवच्या प्रतिभेची चांगलीच ओळख असल्याचे दिसून येते.

सूर्यकुमार यादव ठरला पाचवा भारतीय फलंदाज -

सूर्यकुमार यादव भारताकडून टी-20 मध्ये शतक झळकावणारा केवळ 5वा फलंदाज आहे. सूर्यकुमारपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल, सुरेश रैना आणि दीपक हुडा यांना ही कामगिरी करता आली होती. आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये रोहित शर्माने 4 आणि केएल राहुलने 2 शतके झळकावली आहेत. त्याचवेळी सुरेश रैना आणि हुड्डा यांनी प्रत्येकी शतक झळकावले आहेत.

हेही वाचा - Venkatesh Prasad Statement : कुंबळे, गांगुली आणि युवराज यांना संघातून वगळले गेले... तर कोहलीला का नाही?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.