त्रिनिदाद: भारत आणि वेस्ट इंडिज संघातील तीन सामन्यांची वनडे मालिका भारताने 3-0 ने जिंकली. त्यानंतर या दोन संघात तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळली ( IND vs WI T20 Series ) जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी ब्रायन लारा स्टेडियम त्रिनिदाद येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला संध्याकाळी आठला सुरुवात होणार आहे. तत्पुर्वी कर्णधार रोहित शर्माने एक वक्तव्य केले आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माला ( Captain Rohit Sharma ) विश्वास आहे की टी-20 मध्ये अवलंबण्यात आलेला निडर दृष्टिकोन संघाला अधूनमधून अपयश देईल. पण, गेल्या वर्षी संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकादरम्यान संघाने पुराणमतवादी वृत्ती स्वीकारल्याचा त्यांनी इन्कार केला. रोहित म्हणाला की नवीन दृष्टिकोनामुळे खेळाडूंना अधिक स्वातंत्र्य मिळाले आहे, ज्यामुळे संघाला निराशाजनक विश्वचषक मोहिमेनंतर यश मिळण्यास मदत झाली आहे. विश्वचषकात भारताला दुसऱ्या फेरीच्या पुढे प्रगती करता आली नाही.
-
💬 💬 Here's what captain @ImRo45 said as #TeamIndia gear up for the #WIvIND T20I series. 👍 👍 pic.twitter.com/eVZeUpNe4Y
— BCCI (@BCCI) July 29, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">💬 💬 Here's what captain @ImRo45 said as #TeamIndia gear up for the #WIvIND T20I series. 👍 👍 pic.twitter.com/eVZeUpNe4Y
— BCCI (@BCCI) July 29, 2022💬 💬 Here's what captain @ImRo45 said as #TeamIndia gear up for the #WIvIND T20I series. 👍 👍 pic.twitter.com/eVZeUpNe4Y
— BCCI (@BCCI) July 29, 2022
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेपूर्वी ( Five-match T20 series against West Indies ) रोहित म्हणाला, गेल्या विश्वचषकात आम्हाला अनुकूल निकाल मिळाले नाहीत. पण याचा अर्थ असा नाही की, आम्ही इतक्या वर्षांत वाईट क्रिकेट खेळलो आणि आम्ही ऑर्थोडॉक्स क्रिकेट खेळत होतो, हे मला मान्य नाही. विश्वचषकात आम्ही एक किंवा दोन सामने गमावले तर याचा अर्थ असा नाही की आम्ही संधीचा फायदा घेतला नाही.
विश्वचषकापूर्वी आम्ही जवळपास 80 टक्के सामने जिंकले -
तो म्हणाला, विश्वचषकापूर्वीची आमची कामगिरी पाहिली तर आम्ही जवळपास 80 टक्के सामने जिंकले ( 80 percent matches won before World Cup ). जर आपण पुराणमतवादी दृष्टिकोन स्वीकारला असता, तर इतके सामने कसे जिंकले असते. विश्वचषकात आपण हरलो हे खरे आहे, पण तसे घडते. याचा अर्थ आम्ही मुक्तपणे खेळत नव्हतो असा नाही. रोहित म्हणाला, नंतर आम्ही कोणताही बदल केला नाही. आम्ही पूर्वीप्रमाणेच खेळत होतो पण खेळाडूंना त्यांचा नैसर्गिक खेळ खेळण्यासाठी अधिक स्वातंत्र्य देण्यात आले. मोकळेपणाने खेळा आणि कोणत्याही प्रकारचे अनावश्यक दबाव घेऊ नका. जर तुम्ही मुक्तपणे खेळलात तर ते कामगिरीमध्ये दिसून येईल.
काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न -
रोहित म्हणाला की, भारतीय संघ आणि त्याच्या चाहत्यांना असे बदल करून पुढे जावे लागेल. तो म्हणाला, आता आपण ज्या प्रकारचे क्रिकेट खेळत आहोत, त्यात अधूनमधून अपयश येणे निश्चितच आहे, परंतु ही समस्या नाही. कारण आपण काहीतरी शिकत आहोत आणि काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे यात चुकांना फारसा वाव नाही, पण आमचे खेळाडू खराब खेळत आहेत, असा त्याचा अर्थ होत नाही, असे भारतीय कर्णधार म्हणाला. याचा अर्थ आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत आहोत. काळाबरोबर प्रत्येकाला बदलावे लागेल आणि आपण बदल करत आहोत आणि मला वाटते की बाहेर बसलेल्या लोकांनीही आपली विचारसरणी बदलण्याची गरज आहे.
T20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जवळपास निश्चित -
या वर्षाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषक स्पर्धेसाठी संघ जवळपास निश्चित झाला ( T20 World Cup Squad almost certain ) आहे आणि आता फक्त काही ठिकाणे निश्चित व्हायची आहेत, असे रोहितने म्हटले आहे. "संघात काही पोकळी आहेत जी अजून भरायची आहेत आणि ती पोकळी भरून काढण्यासाठी आम्हाला काय करायचे आहे हे आम्हाला माहित आहे," तो म्हणाला. आम्ही सध्या खेळत असलेल्या सामन्यांमध्ये या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत आहोत. रोहित म्हणाला, आम्ही कोणतीही मालिका खेळत आहोत, ती महत्त्वाची आहे. विश्वचषक नक्कीच जवळ आला आहे पण तुम्ही भारतासाठी कोणतीही मालिका खेळता हे महत्त्वाचे आहे. इंग्लंडमध्ये आम्ही जे काही मिळवले ते महत्त्वाचे होते आणि आम्हाला ते पुढे न्यायचे आहे.
हेही वाचा - Cwg 2022 Opening Ceremony : 22 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे शानदार उद्धघाटन, पहा फोटो