सिडनी - आयपीएल 2021 चा उर्वरित हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी खेळलं पाहिजे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने व्यक्त केलं आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने नुकताच बांगलादेश दौरा केला. या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला टी-20 मालिकेत 4-1 ने दारूण पराभव पत्कारावा लागला. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या संघ टीकेचा धनी ठरला आहे. या दरम्यान रिकी पाँटिंग म्हणाला की, जे खेळाडू मागील तीन चार महिन्यापासून क्रिकेटपासून लांब आहेत. त्यांनी लय मिळवण्यासाठी जगातील अव्वल खेळाडूंविरोधात खेळलं पाहिजे.
यात कोणतीच शंका नाही की, जगातील सर्वोत्तम टी-20 स्पर्धेत खेळल्याने त्यांना त्या परिस्थितीत खेळण्याची आणि राहण्याची चांगली तयारी होईल. या स्पर्धेत जगातील सर्वोत्तम खेळाडू सहभागी होतात. दिल्ली कॅपिटल्समध्ये ऑस्ट्रेलियाचे चांगले खेळाडू असावे, यासाठी मी हे अजिबात म्हणत नाहीये, असे पाँटिग स्पष्ट केले.
दरम्यान, रिकी पाँटिगच्या म्हणणे पाहता, उर्वरित आयपीएल हे युएईमध्ये होणार आहे. आयपीएलनंतर लगेच टी-20 विश्व करंडक स्पर्धा होणार आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा युएई आणि ओमानमध्ये होणार आहे. आयपीएलमध्ये खेळल्याने ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना टी-20 विश्वकरंडक स्पर्धेची तयारी होईल, असे पाँटिंगला वाटते.
आयपीएल 2021 च्या उर्वरित हंगामाला 19 सप्टेंबरपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी चेन्नई सुपर किंग्जचा संघ दुबईला पोहोचला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्याने उर्वरित हंगामाची सुरूवात होणार आहे. या हंगामातील प्ले ऑफ आणि अंतिम सामना मिळून एकूण 31 सामने होणार आहेत. आयपीएल 2021 चा अंतिम सामना 15 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.
हेही वाचा - Ind vs Eng 2nd Test : भारत ३६४ धावांत गारद; दुसऱ्या दिवसाअखेर इंग्लंडच्या ३ बाद ११९ धावा
हेही वाचा - T20 WC 2021: ICCची मोठी घोषणा, टी-20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ इतकेच खेळाडू घेऊ जाऊ शकतील