साउथम्पटन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना साउथम्पटन येथे खेळला जात आहे. भारतीय संघ या सामन्यात पिछाडीवर असून भारताचा पहिला डाव २१७ धावांवर आटोपला आहे. अशात भारतीय संघाचा प्रमुख फिरकीपटू आर अश्विन याने त्याच्या निवृत्तीबाबत मोठी घोषणा केली.
आयसीसीने अश्विनचा एक व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिआ अकाउंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत अश्विन त्याच्या निवृत्तीबाबत सांगताना पाहायला मिळत आहे. प्रतिस्पर्धींमुळे मला सर्वोत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते. सतत सुधारणा करण्याच्या दृष्टीकोनामुळे मी कारकिर्दीत यश मिळवले आहे. त्यात कोणतीच तडजोड मी केलेली नाही. खेळात सुधारणा करत राहण्याचा माझा प्रयत्न सुरूच असतो. पण नवीन काही करण्याची इच्छाच जेव्हा संपेल, तेव्हा मी खेळणं सोडून देईन, असे अश्विनने सांगितलं.
-
“He always loves to come out of his comfort zone. Learn new things. Develop different angles. That’s what makes him so special.”
— ICC (@ICC) June 20, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
What makes @ashwinravi99 tick 📽️#WTC21 #INDvNZ pic.twitter.com/5u1uQeLhAV
">“He always loves to come out of his comfort zone. Learn new things. Develop different angles. That’s what makes him so special.”
— ICC (@ICC) June 20, 2021
What makes @ashwinravi99 tick 📽️#WTC21 #INDvNZ pic.twitter.com/5u1uQeLhAV“He always loves to come out of his comfort zone. Learn new things. Develop different angles. That’s what makes him so special.”
— ICC (@ICC) June 20, 2021
What makes @ashwinravi99 tick 📽️#WTC21 #INDvNZ pic.twitter.com/5u1uQeLhAV
मला संघर्ष करायला मजा येते आणि याच कारणामुळे मी यश मिळवले असल्याचे देखील अश्विन म्हणाला. दरम्यान, अश्विन भारताचा प्रमुख फिरकीपटू आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ७८ सामन्यात खेळताना ४०९ गडी बाद केले आहेत. याशिवाय त्याने फलंदाजीत २ हजार ६५६ धावा देखील केल्या आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये १११ सामन्यांत १५० गडी व ६७५ धावा त्याने केल्या आहेत. ४६ टी-२० सामन्यात ५२ विकेट त्याच्या नावे आहेत.
हेही वाचा - मिल्खा सिंह यांचा पत्नी निर्मलसह अंतिम प्रवास; पाहा प्रेमाचे भावनिक बंध जपणारा फोटो
हेही वाचा - WTC Final: टीम इंडिया २१७ धावांत गारद, जेमिसनचा 'पंच'