कोलकाता : भारतीय संघाने बुधवारी झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजवर 6 विकेट्सने विजय ( Indian team won by 6 wickets ) मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने 1-0 अशा फरकाने आघाडी घेतली. या विजयात पदार्पणवीर रवि बिश्नोईचे ( Ravi Bishnoi debut in Indian team ) महत्वाचे योगदान होते. त्याच्या शानदार कामगीरीबद्दल त्याला 'प्लेयर ऑफ द मॅच' ( Ravi Bishnoi Player of the Match ) हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अंडर-19 विश्वचषक स्पर्धेत भारताच्या 2020 च्या बॅचमधील बिश्नोई हा भारताच्या वरिष्ठ संघात पदार्पण करणारा पहिला खेळाडू आहे.
-
From nerve & verve to a dream #TeamIndia debut!👏 👏
— BCCI (@BCCI) February 17, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
In his maiden Chahal TV appearance, @bishnoi0056 shares his emotions with @yuzi_chahal after India's win in the 1⃣st @Paytm #INDvWI T20I. ☺️ 😎 - By @Moulinparikh
Watch the full interview 🎥 🔽https://t.co/HTjXQGKlg3 pic.twitter.com/5dMyWXUblu
">From nerve & verve to a dream #TeamIndia debut!👏 👏
— BCCI (@BCCI) February 17, 2022
In his maiden Chahal TV appearance, @bishnoi0056 shares his emotions with @yuzi_chahal after India's win in the 1⃣st @Paytm #INDvWI T20I. ☺️ 😎 - By @Moulinparikh
Watch the full interview 🎥 🔽https://t.co/HTjXQGKlg3 pic.twitter.com/5dMyWXUbluFrom nerve & verve to a dream #TeamIndia debut!👏 👏
— BCCI (@BCCI) February 17, 2022
In his maiden Chahal TV appearance, @bishnoi0056 shares his emotions with @yuzi_chahal after India's win in the 1⃣st @Paytm #INDvWI T20I. ☺️ 😎 - By @Moulinparikh
Watch the full interview 🎥 🔽https://t.co/HTjXQGKlg3 pic.twitter.com/5dMyWXUblu
बीसीसीआयने गुरुवारी एक व्हिडिओ अपलोड केला आहे, ज्यामध्ये बिश्नोईने सांगितले की, योग्य लाईन आणि लेन्थवर गोलंदाजी करायची योजना होती. फलंदाजांना जास्त जागा देण्याची योजना नव्हती, कारण त्यांना हात मोकळे करायाला संधी दिली की ते मोठे फटके मारायचा प्रयत्न करणार होते. बिश्नोईने वरिष्ठ लेग-स्पिनर युझवेंद्र चहलशी ( Senior leg-spinner Yuzvendra Chahal ) संभाषणात सांगितले की, ते (वेस्ट इंडिज) टी-20 मधील सर्वोत्तम संघांपैकी एक आहेत. त्यामुळे स्टंप-टू-स्टंप गोलंदाजी करण्याची आणि जास्त जागा न देण्याची योजना होती. सामना सुरू होण्यापूर्वी, बिश्नोईने चहलकडून त्याच्या पदार्पणाची ( Bishnoi took debut cap from Chahal )टी-20 कॅप घेतली, जो वरिष्ठ लेग-स्पिनर आहे.
बिश्नोई म्हणाला, जेव्हा मला माझी कॅप मिळाली, तेव्हा मला खुप चांगले वाटले. हे स्वप्न सत्यात उतरण्यासारखे होते आणि युझवेंद्र चहलकडून कॅप मिळाल्यावर बरे वाटले. भारताकडून खेळण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते आणि जेव्हा मला खेळण्याची संधी मिळाली. तेव्हा मी माझ्या क्षमतेनुसार खेळण्याचा प्रयत्न केला. 21 वर्षीय बिश्नोईने भारतीय संघ, विशेषत: मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Head Coach Rahul Dravid ) यांनी त्याचे स्वागत कसे केले हे देखील स्पष्ट केले.
तो म्हणाला, भारतासाठी खेळणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. जेव्हा मी पहिल्य दिवशी सरावाला आलो, तेव्हा मी उत्साहित आणि घाबरलेला होतो. जेव्हा राहुल द्रविड सरांनी माझे संघात स्वागत केले, तेव्हा मला खुप छान वाटले. तसेच तो पुढे म्हणाला, मी सराव आणि नेट सत्रा दरम्यान आपल्या सीनियर खेळाडूंसोबत आनंद घेतला. सर्वांनी मला चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आणि छोट्या गोष्टीत चांगले करण्यासाठी समर्थन दिले. मला खुप काही शिरकायचे आहे आणि संघाला जिंकवण्यासाठी सर्वश्रष्ठ योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे