नवी दिल्ली : रणजी ट्रॉफी (Ranji Trophy Tournament)ही देशांतर्गत खेळली जाणारी प्रमुख स्पर्धा आहे. यंदा ही स्पर्धा दोन सत्रात आयोजित केली जाणार आहे. आता या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेत 38 संघाचा समावेश आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा 10 फेब्रुवारी ते 15 मार्च पर्यंत आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील आयोजन हे आयपीएल 2022 च्या हंगामानंतर 30 मे ते 26 जूनपर्यंत आयोजित केला जाणार आहे. एकूण 62 दिवसात 64 सामने पार पडतील.
बीसीसीआयचे सचिव जय शाह (BCCI Secretary Jai Shah) यांनी गुरुवारी क्रिकबझमधील एका अहवालात म्हटले आहे की, "आम्ही क्रॉस-ट्रांसमिशनचा धोका कमी करण्यासाठी देशभरातील नऊ वेगवेगळ्या ठिकाणी रणजी करंडक आयोजित करण्याचा विचार केला आहे." बायो-बबलमुळे जास्त त्रास होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे.
वेळापत्रकानुसार रणजी करंडक स्पर्धेतील संघांची नऊ गटांमध्ये विभागणी (Ranji Trophy teams divided into nine groups) करण्यात आली आहे. एलिट गटात चार संघ आहेत, तर प्लेट गटात सहा संघ ठेवण्यात आले आहेत. एलिट संघ एका गटात एकमेकांविरुद्ध खेळतील, तर प्लेट संघ त्यांच्या गटात फक्त तीन संघाविरुद्ध खेळतील. रचनेनुसार, प्रत्येक एलिट गटातील एक संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरेल. एलिट श्रेणीतील आठ पात्रता संघांपैकी सर्वात खालच्या क्रमांकाचे संघ प्री-क्वार्टर फायनलमध्ये प्लेट गटातील अव्वल संघाशी खेळतील. उपांत्यपूर्व फेरीचा ड्रॉ उपउपांत्यपूर्व फेरीच्या समारोपानंतर होणार आहे.
अहमदाबाद, राजकोट, दिल्ली, गुवाहाटी, कटक, त्रिवेंद्रम, चेन्नई आणि हरियाणा (रोहटक आणि गुरुग्राम) येथे एलिट संघांचे सामने होतील. कोलकाता 2021/22 रणजी ट्रॉफीमध्ये प्लेट संघांचे सामने आयोजित करेल. कोणताही संघ आपले सामने घरच्या मैदानावर खेळणार नाही, कारण स्पर्धा तटस्थ ठिकाणाचा पर्याय आहे.
संघांचे गट आणि वाटप केलेली ठिकाणे खालीलप्रमाणे आहेत-
- राजकोट येथे एलिट अ सामने - गुजरात, मध्य प्रदेश, केरळ आणि मेघालय.
- कटक येथे एलिट ब सामने - बंगाल, बडोदा, हैदराबाद आणि चंदीगड.
- चेन्नई येथे एलिट सी सामने - जम्मू आणि काश्मीर, कर्नाटक, रेल्वे आणि पाँडेचेरी.
- अहमदाबादमध्ये एलिट डी सामना - सौराष्ट्र, मुंबई, ओडिशा आणि गोवा.
- त्रिवेंद्रममधील एलिट ई सामना - आंध्र प्रदेश, राजस्थान, सर्व्हिसेस आणि उत्तराखंड.
- एलिट एफ दिल्लीमधील सामने - पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि त्रिपुरा.
- एलिट जी हरियाणामधील सामने - विदर्भ, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि आसाम.
- गुवाहाटी येथे एलिट एच सामने - दिल्ली, तामिळनाडू, झारखंड आणि छत्तीसगड.
- कोलकाता येथे प्लेट सामने - बिहार, नागालँड, मणिपूर, मिझोराम, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश