मुंबई - शिखर धवन याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात उभय संघात ३ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामन्याची मालिका खेळवण्यात येणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राहुल द्रविड हे श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत, असे सांगितलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार राहुल द्रविडसोबत राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत काम करणारा स्टाफच श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे.
दरम्यान, हा दौरा जुलै महिन्यात होणार आहे. श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी भारताचे खेळाडू १४ दिवसांसाठी मुंबईत विलगिकरणात राहतील. श्रीलंका दौऱ्यासाठी गुरुवारी भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे.
असा आहे भारतीय संघ -
शिखर धवन ( कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडीक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, नितीश राणा, इशान किशन (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), युझवेंद्र चहल, राहुल चहर, के गौथम, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, वरूण चक्रवर्थी, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी आणि चेतन सकारीया.
हेही वाचा - WTC फायनल : विजेत्याला मिळणार तब्बल 'इतकी' रक्कम
हेही वाचा - WTC FINAL : अंतिम सामन्याआधी पुजाराची डरकाळी, म्हणाला...