हैदराबाद Rachin Ravindra : कालपासून इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्यानं यंदाच्या विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली. पहिल्याच सामन्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीनं गत विश्वविजेत्या संघाला सळो की पळो करुन सोडणारा रचिन रविंद्र सध्या चांगलाच चर्चेत आलाय. हा खेळाडू आहे तरी कोण जाणून घेऊयात.
काय आहे त्याच्या नावाचा इतिहास : अष्टपैलू रचिन रवींद्रचा जन्म वेलिंग्टनमधील भारतीय कुटुंबात झाला. रचिन रवींद्र हा डावखुरा आक्रमक फलंदाज आहे. तसेच तो फिरकी गोलंदाजीही करतो. त्याच्या अष्टपैलू कौशल्यानं देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याला प्रतिभाशाली खेळाडू म्हणून ओळखलं जातं. त्याला U-19 आणि न्यूझीलंड अ संघासोबत खेलण्याची भरपूर संधी मिळाली आहे. त्याच्या वडिलांना त्यानं राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारख बनावं अशी अपेक्षा होती. त्यामुळं त्याचं नाव रचिन ठेवलं. 5 ऑक्टोबर, 2023 रोजी, या विश्वचषकाच्या उद्घाटनाच्या सामन्यात त्याच्या वडिलांच्या अपेक्षेप्रमाणं खेळत त्यानं गतविजेत्या इंग्लंडचा 96 चेंडूत 11 चौकार आणि पाच षटकार आणि 128.1 च्या स्ट्राइक रेटसह 123 धावा काढत एकहाती पराभव केला. विश्वचषक 2019 च्या फायनलमध्ये इंग्लंडकडून अत्यंत कठीण परिस्थितीत पराभव पत्करलेल्या किवींनी एक प्रकारे बदलाच घेतलाय.
आतापर्यंतची कामगिरी कशी : न्यूझीलंडचा सलामीविर विल यंगला शुन्यावर बाद केल्यावर आपण टॉपवर असल्याचं इंग्लंडला वाटलं. मात्र त्याचवेळी डोक्यावर कुरळे केस असलेला कर्नाटकी किवी न्यूझीलंडसाठी दिवस जिंकण्याच्या निर्धारानं बाहेर पडला. या 23 वर्षीय अष्टपैलू खेळाडूनं केवळ दोन वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. तसंच आतापर्यंत त्याला केवळ 13 एकदिवसीय सामन्यांचा अनुभव आहे. हा डावखुरा फलंदाज आणि फिरकी गोलंदाज वेलिंग्टनमध्ये जन्माला आला आणि वाढला. त्यानं कानपूरमध्ये भारताविरुद्धच कसोटीत पदार्पण केलं हेतं. न्यूझीलंडमध्ये स्थायी होण्यापूर्वी तो बेंगळुरुमध्ये क्लब स्तरावर क्रिकेट खेळत होता.
तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी : कालच्या सामन्यात तो जेव्हा गोलंदाजी करायला आला, तेव्हा त्यानं आपल्या पहिल्याच षटकात हॅरी ब्रूकची महत्त्वपूर्ण विकेट घेतली, योगायोगानं कॉन्वेनेच त्याच्या गोलंदाजीवर ब्रूकचा झेल पकडला. त्यानंतर त्यानं फलंदाजी करताना त्याचा साथीदार कॉन्वेसोबत 273 धावांची अभूतपूर्व भागीदारी रचली. विशेष म्हणजे, रचिन रवींद्र त्याच्या चौकोनी जबड्यामुळे जिलेटच्या जाहिरातीसाठी यशस्वी मॉडेल होऊ शकतो. तो दुखापतग्रस्त केन विल्यमसनच्या जागी संघात आहे. संघाची पहिली विकेट लवकर पडल्यानं झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी तो क्रमांक 3 वर फलंदाजीसाठी आला होता.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : विश्वचषक सलामीच्या सामन्यात रचिन रविंद्रची तुफान 'खेळी'; जाणून घ्या त्याच्या नावाचा रंजक इतिहास ?
- Cricket World Cup 2023 : विश्वचषकात 'हे' 8 खेळाडू ठरले प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, यावेळी कोणाचा नंबर?
- Cricket World Cup 2023 : श्रीलंकेचे वाघ विश्वचषक स्पर्धेत फोडणार का डरकाळी ? काय आहे श्रीलंकेची ताकद, वाचा सविस्तर