बंगळुरु : भारत विरुद्ध श्रीलंका ( India vs Sri Lanka ) संघात दोन सामन्यांची मालिका सोमवारी पार पडली. सोमवारी पार पडलेल्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारताने 238 धावांनी विजय मिळवला. तसेच श्रीलंकेला मालिकेत 2-0 ने क्लीन स्वीप दिला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने मालिका विजयानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ज्यामध्ये त्याने जसप्रीत बुमराहचे कौतुक केले.
-
🗣️ 🗣️ #TeamIndia captain @ImRo45 speaks about the experience and learnings on leading the side for the first time in a Test series. 👍 👍#INDvSL | @Paytm pic.twitter.com/41EuDxyDrG
— BCCI (@BCCI) March 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">🗣️ 🗣️ #TeamIndia captain @ImRo45 speaks about the experience and learnings on leading the side for the first time in a Test series. 👍 👍#INDvSL | @Paytm pic.twitter.com/41EuDxyDrG
— BCCI (@BCCI) March 14, 2022🗣️ 🗣️ #TeamIndia captain @ImRo45 speaks about the experience and learnings on leading the side for the first time in a Test series. 👍 👍#INDvSL | @Paytm pic.twitter.com/41EuDxyDrG
— BCCI (@BCCI) March 14, 2022
कर्णधार रोहित शर्मा आभासी पत्रकार परिषदेत ( Rohit Sharma Virtual Press Conference ) बोलताना म्हणाला, श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात त्याचे (बुमराह ) प्रदर्शन शानदार होते. या सामन्यात जसप्रीत बुमराहने 47 धावा देताना 8 विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने प्रथमच मायदेशात कसोटी सामना खेळताना पाच विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. त्याची कामगीरी या खेलपट्टीवर उल्लेखणीय होती. कारण ही खेळपट्टी खासरकरुन फिरकी गोलंदाजांसाठी तयार करण्यात आली होती.
रोहित शर्मा पुढे म्हणाला, "बुमराहची कामगिरी शानदार ( Bumrah performance is fantastic ) होती, यात शंका नाही. अशा परिस्थितीत गोलंदाजी करणे, हे दाखवते की त्याच्याकडे किती कौशल्य आणि क्षमता आहे. बुमराहसारखी कोणतीही व्यक्ती कधीही खेळातून बाहेर होऊ शकणार नाही. परिस्थिती कशी ही असो, तो नेहमीच खेळात असतो. याचा कर्णधाराला गोलंदाजांना फिरवण्यात आणि प्रत्येक गोलंदाजाकडून सर्वोत्तम कामगिरी करण्यात खूप फायदा होतो. जेव्हा तुमच्याकडे बुमराहसारखा दर्जेदार खेळाडू संघात असतो, तेव्हा असे घडते."
-
Words of praise from #TeamIndia Captain @ImRo45 for the champion bowler @ashwinravi99 👏 👏#INDvSL | @Paytm pic.twitter.com/SKySkSMj13
— BCCI (@BCCI) March 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Words of praise from #TeamIndia Captain @ImRo45 for the champion bowler @ashwinravi99 👏 👏#INDvSL | @Paytm pic.twitter.com/SKySkSMj13
— BCCI (@BCCI) March 14, 2022Words of praise from #TeamIndia Captain @ImRo45 for the champion bowler @ashwinravi99 👏 👏#INDvSL | @Paytm pic.twitter.com/SKySkSMj13
— BCCI (@BCCI) March 14, 2022
शर्माने सांगितले की बुमराह वेगवेगळ्या परिस्थितीत कशी चांगली कामगिरी करू शकतो, मग ते मैदान मायदेशातील असो किंवा बाहेरचे
तो म्हणाला, "त्याला परिस्थिती चांगल्या पद्धतीने समजते, हाच त्याचा प्लस पॉइंट ( Plus point of Bumrah ) आहे. ठराविक खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करण्यासाठी तुम्हाला काही कौशल्याची गरज असते आणि तो त्याचे कौशल्य परिस्थिती आणि खेळात आणतो. हे त्याच्याकडे कोणत्या प्रकारची मागणी आहे यावर अवलंबून असते.
रोहित शर्मा म्हणाला, "आम्ही मोहालीमध्ये वेगळ्या प्रकारची खेळपट्टी पाहिली, पण तरीही ती प्रभावी होती आणि काही विकेट्सही मिळाल्या. बंगळुरूमधील खेळपट्टी पूर्णपणे वेगळी होती. ती फिरकीपटूंना खूप मदत करत होती, फिरकीपटूंसाठी वळण आणि उसळी घेत होती, सर्व काही घडत होते. पण बुमराहकडे नेहमीच यष्टीवर मारण्याचे कौशल्य आहे. तो नेहमी खेळात असतो. मला वाटते की, तो खरोखरच चांगला खेळला."
-
Spirit of Cricket at its best as #TeamIndia congratulate Suranga Lakmal who played his last international match 🤜🤛 #SpiritOfCricket | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/aa17CK5hqv
— BCCI (@BCCI) March 14, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Spirit of Cricket at its best as #TeamIndia congratulate Suranga Lakmal who played his last international match 🤜🤛 #SpiritOfCricket | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/aa17CK5hqv
— BCCI (@BCCI) March 14, 2022Spirit of Cricket at its best as #TeamIndia congratulate Suranga Lakmal who played his last international match 🤜🤛 #SpiritOfCricket | #INDvSL | @Paytm pic.twitter.com/aa17CK5hqv
— BCCI (@BCCI) March 14, 2022
शर्माने मोहम्मद शमीची आठवण करून दिली, ज्याने बुमराहसह भारताला पहिल्या डावात महत्त्वपूर्ण यश मिळवून दिले
तो म्हणाला, "आपण शमीलाही विसरता कामा ( Shami should not be forgotten ) नये. पहिल्या डावात त्याने काही विकेट्स मिळवल्या. हे दोघेही भारतासाठी अप्रतिम ठरले आहेत. ते कोणत्याही पोझिशनमध्ये असोत तो खेळात नेहमीच असतो, कारण त्याच्याकडे उच्च कौशल्य आहे. बॉल रिव्हर्स करा, बॅट्समनला बॉलिंग करताना तो खूप वेरिएशन करु शकतो. टीममध्ये त्याच्यासारखा व्यक्ती असणे नेहमीच चांगली गोष्ट असते."
शर्मा म्हणाला की, येत्या काही महिन्यांत आणि वर्षांत तुम्हाला बुमराह भारतात आणि परदेशातही कसोटी सामने खेळताना दिसेल. बुमराहसारखा खेळाडू ज्या पद्धतीने सामन्याची व्याख्या करतो, कामाचा भार सांभाळतो, हे त्याच्यासाठी आणि संघ व्यवस्थापनासाठी एक आव्हान असणार आहे.