बेंगळुरू (कर्नाटक) Online Betting in Cricket : खेळात हारणे व जिंकणे यांवर सट्टा लावणं ही नवीन बाब नाही. आजही अनेक खेळांमध्ये जय-पराजयाचा अंदाज उघडपणे लावला जातो. पण कालांतरानं सट्टेबाजी हा व्यवसाय बनलाय. आज अनेक देशांमध्ये कायदा आणून तो अधिकृत केलाय. मात्र, दुसरीकडं ऑफलाइन बेटिंग खेळणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही. भारतात सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकादरम्यान सट्टेबाजीचं रॅकेट सक्रिय होण्याची दाट शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या आशिया चषक आणि कॅरेबियन प्रीमियर लीगसारख्या क्रीडा स्पर्धांमध्ये सट्टेबाजी करणाऱ्या अनेक आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. यावेळीही पोलिसांनी सट्टेबाजांवर नजर ठेवण्यासाठी कंबर कसलीय.
सट्टेबाजींमुळं अनेक कुटुंब आर्थिक अडचणीत : ऑफलाइन बेटिंग घोटाळे शोधणे पोलिसांसाठी एक आव्हानात्मक काम आहे, जे इतर गुन्हेगारी क्रियाकलापेक्षा थोडं वेगळं आहे. साधारणपणे सट्टेबाजी हा इतर गुन्ह्यांसारखा नसतो कारण तो ओळखीचे, मित्र आणि त्यांच्यामार्फत भेटणाऱ्यांमध्ये होतो. त्यामुळं मोठ्या क्रीडा स्पर्धांच्या वेळी पब, बार, रेस्टॉरंट, सोशल क्लब आदी ठिकाणांवर पोलिस लक्ष ठेवून असतात. यातील अनेक प्रकरणांमध्ये पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून मध्यस्थांना अटक केली जाते. सट्टेबाजी हा एक व्यवसाय आहे, ज्यात बरेच पैस लोकं पैसे गमावतात तर काही लोकं मोठ्या प्रमाणात पैसे मिळवतात. त्यामुळं अनेक कुटुंबांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागल्याची उदाहरणं आहेत. काही वेळा पैसे न दिल्यानं आणि इतर अनेक कारणांमुळं गुन्हेगारी कृत्ये होतात. त्यामुळं लोकांनी सट्टेबाजी करू नये आणि त्यांना याबाबत माहिती मिळाल्यास पोलिसांना कळवावं, असं आवाहन शहर सीसीबीनं केलंय.
सट्टेबाजीच्या जाहिराती दाखवू नये : श्रीलंकेत आशिया चषक आणि भारतात क्रिकेट विश्वचषक सुरू होण्याआधी, केंद्रानं प्रसारमाध्यमांना प्रमुख क्रीडा स्पर्धांच्या प्रसारणादरम्यान सट्टेबाजी किंवा जुगाराच्या इतर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती दाखवू नयेत असे निर्देश दिले होते. हा नियम आता प्रिंट आणि टीव्ही मीडियापासून सोशल मीडिया एजन्सी आणि जाहिरात एजन्सीपर्यंत सर्व माध्यमांवर लागू करण्यात आलाय. या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्यास योग्य कारवाई केली जाईल, असा इशारा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात इशारा देण्यात आलाय.
जाहिरात प्रसारित केल्यास कारवाई : सट्टेबाजीसारख्या जुगाराच्या जाहिरातींसाठी काळ्या पैशाचा वापर केला जाण्याची दाट शक्यता आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं सांगितलं की, एजंटांकडून जुगाराच्या ॲप्सच्या वापरकर्त्यांकडून गोळा केलेले पैसे भारताबाहेर पाठवले जात आहेत. अशा घटना उघडकीस आल्या आहेत. जुगारामुळं तरुण आणि मुलांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बिघडत असल्याचा इशारा यात देण्यात आलांय. आजकाल, क्रिकेटसह मोठ्या क्रीडा स्पर्धांमध्ये सट्टेबाजी आणि जुगाराच्या जाहिराती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे प्रसारित केल्या जातात. सरकारनं या प्रकारची जाहिरात प्रसारित न करण्याचा गांभीर्यानं विचार केलाय. क्रिकेटसारख्या महत्त्वाच्या खेळातही ऑनलाइन जाहिरात मध्यस्थांनी अशा जाहिराती भारतीय प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू नयेत, असं स्पष्ट करण्यात आलंय. जर कोणी अशी जाहिरात प्रसारित केली तर, ती ग्राहक संरक्षण कायदा 2019 आणि प्रेस कौन्सिल कायदा 1978 सारख्या अनेक कायदेशीर आदेशांचं उल्लंघन असेल, असं स्पष्ट करण्यात आलंय.
हेही वाचा :
- Cricket World Cup 2023 : हे आहे भारतातील सर्वात आधुनिक क्रिकेट स्टेडियम, कितीही पाऊस आला तरी मॅच होणार नाही रद्द!
- Cricket world cup 2023 : ना धोनी, ना युवराज; कोणते आहेत वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप-५ फलंदाज
- Cricket World Cup 2023 : विकेट किपींसाठी इशान किशन माझी पहिली पसंती - नयन मोंगिया