वेलिंग्टन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १८ जूनपासून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. या सामन्यानंतर न्यूझीलंडचा दिग्गज कसोटी यष्टीरक्षक फलंदाज बी. जे. वॉटलिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. न्यूझीलंडसाठी वॉटलिंगचा हा शेवटचा सामना असणार आहे.
-
🥇 Most Test dismissals by a @BLACKCAPS keeper
— ICC (@ICC) May 11, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
🥇 Most Test runs by a New Zealand keeper
🥇 Highest individual Test score by a New Zealand keeper
Congratulations to @B_Jwatling, who is hanging up the gloves after the #WTC21 final 🧤 pic.twitter.com/OnvERRGviV
">🥇 Most Test dismissals by a @BLACKCAPS keeper
— ICC (@ICC) May 11, 2021
🥇 Most Test runs by a New Zealand keeper
🥇 Highest individual Test score by a New Zealand keeper
Congratulations to @B_Jwatling, who is hanging up the gloves after the #WTC21 final 🧤 pic.twitter.com/OnvERRGviV🥇 Most Test dismissals by a @BLACKCAPS keeper
— ICC (@ICC) May 11, 2021
🥇 Most Test runs by a New Zealand keeper
🥇 Highest individual Test score by a New Zealand keeper
Congratulations to @B_Jwatling, who is hanging up the gloves after the #WTC21 final 🧤 pic.twitter.com/OnvERRGviV
वॉटलिंग म्हणाला, निवृत्ती घेण्याची ही योग्य वेळ आहे. न्यूझीलंडचे प्रतिनिधीत्व करणे ही सन्मानाची आणि खास बाब आहे. कसोटी हेच क्रिकेटचे मुख्य स्वरुप आहे. मी कसोटी खेळताना संघाकडून प्रत्येक मिनिटाचा आनंद घेतला. त्या पाच दिवसानंतर मी संघातील खेळाडूसोबत बिअर घेऊन बसणे, मला लक्षात राहील. मी काही महान खेळाडूंबरोबर खेळलो आहे आणि बरेच चांगले मित्र केले आहेत. या प्रवासात मला खूप मदत मिळाली आहे आणि मी सर्वांचा आभारी राहीन.'
दरम्यान, वाटलिंगने २००९ साली न्यूझीलंड संघात एन्ट्री मिळवली. तो न्यूझीलंडच्या कसोटी संघातील एक महत्वाचा खेळाडू आहे. वाटलिंग यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक विकेट घेणारा आणि सर्वाधिक धावा करणारा न्यूझीलंडचा पहिला खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत २४९ झेल टिपले आहेत. तर ८ स्टंम्पिग त्यांच्या नावे आहे. फलंदाजीत त्याने, ३९.७७च्या सरासरीने ३ हजार ३८१ धावा केल्या आहेत. यात ८ शतकांचा समावेश असून २०५ ही त्याची वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या आहे. याशिवाय वॉटलिंगने न्यूझीलंडकडून ५ टी-२० आणि २८ एकदिवसीय सामनेही खेळली आहेत.
हेही वाचा - भारताचा माजी गोलंदाज आर. पी. सिंग याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन
हेही वाचा - IPL २०२१ : भारताच्या काही वरिष्ठ खेळाडूंना निर्बंध आवडत नाहीत, मुंबईच्या प्रशिक्षकाचा गौप्यस्फोट