नवी दिल्ली : न्यूझीलंडने पहिल्या डावात 580 धावा केल्या होत्या. या सामन्यात दोन खेळाडूंनी द्विशतके झळकावली. केन विल्यमसनने 215 धावांची खेळी केली. तर निकोल्सने 200 धावा केल्या. न्यूझीलंडच्या 580 धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ पहिल्या डावात 164 धावांत गारद झाला. फॉलोऑन खेळण्यासाठी उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाला दुसऱ्या डावातही न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा सामना करता आला नाही. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 358 धावांत गारद झाला.
-
New Zealand overcome Sri Lanka's resistance to take the Test series 2-0.#WTC23 | 📝: https://t.co/6AWsAQ7CTM pic.twitter.com/JVTcCOWZEi
— ICC (@ICC) March 20, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">New Zealand overcome Sri Lanka's resistance to take the Test series 2-0.#WTC23 | 📝: https://t.co/6AWsAQ7CTM pic.twitter.com/JVTcCOWZEi
— ICC (@ICC) March 20, 2023New Zealand overcome Sri Lanka's resistance to take the Test series 2-0.#WTC23 | 📝: https://t.co/6AWsAQ7CTM pic.twitter.com/JVTcCOWZEi
— ICC (@ICC) March 20, 2023
चार खेळाडू परतले : श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेने पहिल्या डावात सर्वाधिक 89 धावा केल्या. श्रीलंकेचे चार खेळाडू भोपळाही फोडू शकले नाही आणि पॅव्हेलियनमध्ये परतले. धनंजय डी सिल्वाने दुसऱ्या डावात 98 धावा केल्या. त्याचवेळी दिनेश चंडिमलनेही 62 धावांची खेळी केली. दिमुथने दुसऱ्या डावात 51 धावा केल्या. कुसल मेंडिसनेही 50 धावांची धडाकेबाज खेळी केली.
न्यूझीलंडने पहिली कसोटी जिंकली : न्यूझीलंडने श्रीलंकेवर विजय मिळवला. क्राइस्टचर्चमधील पहिल्या कसोटीत एका रोमांचक सामन्यात दोन विकेट्सने विजय मिळवला. हा सामना आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021-23 अंतर्गत खेळला गेला. हा सामना एकदिवसीय सामन्यासारखाच रोमांचक होता. न्यूझीलंडला शेवटच्या षटकात आठ धावांची गरज होती. केन विल्यमसन आणि असिथा फर्नांडो मैदानात होते. तिसऱ्या चेंडूवर एक धावबाद झाला. चौथ्या चेंडूवर चौकार मारला गेला. पाचवा चेंडू डॉट होता. सहाव्या चेंडूवर धाव घेत न्यूझीलंडने सामना जिंकला.
मायकेल आणि मॅटचे वर्चस्व : पहिल्या डावात न्यूझीलंडच्या मायकेल ब्रेसवेल आणि मॅट हेन्री यांनी प्रत्येकी तीन बळी घेतले. मॅट हेन्रीने 20 षटकात 44 धावा देत तीन विकेट घेतल्या. हेन्रीने 6 मेडन ओव्हर्स टाकले आणि मायकेल ब्रेसवेलने 12 षटकांत 50 धावांत तीन बळी घेतले. ब्रेसवेलने मेडन ओव्हर टाकले.
हेही वाचा : Ind Vs Aus Second ODI : भारताचा ऑस्ट्रेलियाकडून लाजीरवाणा पराभव; 117 धावातच गुंडाळले, 4 फलंदाज शून्यावर बाद