ETV Bharat / sports

New Zealand vs Netherlands: न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड यांच्यातील टी-20 सामना पावसामुळे रद्द

न्यूझीलंड विरुद्ध नेदरलँड ( New Zealand vs Netherlands ) यांच्यातील एकमेव टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना शुक्रवारी पावसामुळे रद्द करावा लागला. सामन्यापूर्वी मुसळधार पावसामुळे आउटफिल्ड ओली झाली होती, तर गोलंदाजांच्या रन अप निसरडे झाले होते.

author img

By

Published : Mar 25, 2022, 7:11 PM IST

New Zealand
New Zealand

नेपियर: न्यूझीलंड आणि नेदरलँड यांच्यात एकमेव टी-20 सामना शुक्रवारी खेळला जाणार होता. परंतु या सामन्याला पावसाचा व्यत्यय आल्यामुळे एक एकही चेंडू न टाकता, हा सामना रद्द घोषित ( Match canceled due to rain ) करण्यात आला. सामना सुरु होण्याच्या अगोदरच मॅक्लीन पार्कमध्ये पाऊस पडत होता. मैदान साफ करण्यासाठी ग्राउंड स्टाफने अथक परिश्रम घेतली, असताना स्थानिक वेळेनुसार सायंकाळी साडेसहा वाजता पंचांनी पाहणी केली. पण आउटफिल्डच्या खराब परिस्थितीमुळे, स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता पंचांनी आणखी एक तपासणी निर्धारित केली होती.

दरम्यान, स्थानिक वेळेनुसार रात्री 8 वाजेपर्यंत पाहणी पुढे ढकलून पुन्हा पाऊस सुरू झाला. 20 मिनिटांनंतर, जेथे नाणेफेक देखील झाली नाही, अशा कोणत्याही खेळाची शक्यता पंचांना नाकारावी लागली. न्यूझीलंडचा नेदरलँड दौरा ( New Zealand tour of the Netherlands ) आता तीन सामन्यांच्या वनडे मालिकेने पुढे जाईल, जो 29 मार्चपासून माउंट माउंगानुई येथे सुरू होईल, त्यानंतर पुढील दोन सामने हॅमिल्टनमध्ये होतील.

एकदिवसीय मालिका ही आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुपर लीगचा ( ICC Cricket World Cup Super League ) भाग आहे. जेथे न्यूझीलंड आणि नेदरलँड अनुक्रमे 12 व्या आणि 13 व्या स्थानावर सर्वात खाली आहेत. न्यूझीलंडने केवळ तीन सामने खेळले असून सर्व जिंकले आहेत. दुसरीकडे, नेदरलँड्सने आतापर्यंत सात सामने खेळले असून, दोन जिंकले आहेत, चार पराभूत झाले आहेत आणि एकाचा निकाल लागला नाही.

हेही वाचा - IPL Schedule 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात 10 संघाचे कधी आणि कुठे आहेत सामने? जाणून घ्या एका क्लिकवर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.