ETV Bharat / sports

National Sports Day 2023 :29 ऑगस्टला का साजरा केला जातो राष्ट्रीय क्रीडा दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व... - प्रयागराज उत्तर प्रदेश

दरवर्षी 29 ऑगस्ट म्हणजेच मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राष्ट्रीय भवनात विविध खेळामध्ये पारंगत असलेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिला जातो. जाणून घ्या काय आहे इतिहास आणि महत्त्व....

National Sports Day 2023
राष्ट्रिय क्रिडा दिन
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 28, 2023, 12:26 PM IST

Updated : Aug 29, 2023, 6:40 AM IST

हैदराबाद : दरवर्षी 29 ऑगस्ट हा हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद सिंह यांनी भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत हॉकीमध्ये सुवर्णपदक मिळवून दिले होते. त्यांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 29 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मेजर ध्यानचंद यांनी आपल्या करिअरमध्ये 400हून अधिक गोल केले आहेत.

हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद :

  • 29 ऑगस्ट 1905 रोजी प्रयागराज उत्तर प्रदेश येथे मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला.
  • मेजर ध्यानचंद यांनी 1922 मध्ये भारतीय लष्कराचा भाग बनून देशाची सेवा केली.
  • 1956साली भारतीय लष्करातून मेजर पदावरून निवृत्त झाले.
  • मेजर ध्यानचंद यांनी हॉकीमध्ये केलेल्या पराक्रमामुळे त्यांना 'हॉकीचा जादूगार' ही पदवी देण्यात आली.
  • 1928, 1932 आणि 1936 साली उन्हाळी ऑलिंपिकमध्ये मेजर ध्यानचंद यांनी भारताला ऑलिम्पिक सुवर्णपदकांची पहिली हॅटट्रिक मिळवून देण्यात महत्ताची भूमिका बजावली.
  • 1956मध्ये त्यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला.
  • त्यांच्या निधनानंतर भरतीय टपाल विभागाने त्यांच्या सन्मानार्थ टपाल तिकीट बनविले. तसेच दिल्ली नॅशनल स्टेडियमचे नाव मेजर ध्यानचंद स्टेडियम असे ठेवण्यात आले आहे.
  • राष्ट्रीय क्रीडा दिनाचा इतिहास : भारत सरकारने 2012मध्ये मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. या दिवशी राष्ट्रीय भवनात विविध खेळामध्ये पारंगत असलेल्या खेळाडूंना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार दिला जातो.
  • राष्ट्रीय क्रीडा दिनाचे महत्त्व : लोकांना खेळाचे महत्त्व पटवून देणे आणि त्याचा प्रचार करणे हे या दिवसाचे उद्दिष्ट्य असते. जीवनात तंदुरूस्त राहण्यासाठी खेळ हा एक उत्तम उपाय आहे. हा दिवस खेळाडूंना समर्पित केला जातो.

हेही वाचा :

  1. Neeraj Chopra News : नीरज चोप्राची ऐतिहासक कामगिरी, जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये सुर्वणपदक मिळविणारा ठरला पहिला भारतीय
  2. World Athletics Championships : पारुल चौधरीनं मोडला राष्ट्रीय विक्रम, पुरुष रिले संघ ५ व्या स्थानी
  3. Neeraj Chopra Record : 'गोल्डन बॉय' च्या गावात एकच जल्लोष! 'देशासाठी अभिमानाचा क्षण', नीरज चोप्राच्या वडिलांची प्रतिक्रिया

Last Updated : Aug 29, 2023, 6:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.