हैदराबाद Mumbai Indians : इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएल 2024 च्या पूर्वी मोठा उलटफेर झाला. रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून पायउतार व्हावं लागलं. मुंबई इंडियन्सच्या फ्रँचायझीने कर्णधारपदाची माळ हार्दिकच्या गळ्यात घालताच चाहत्यांनी संताप व्यक्त केला. इतकंच नव्हे तर काही खेळाडूंनीही सोशल मीडियाद्वारे आपलं मत व्यक्त करण्याचा प्रयत्न केलाय. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघाची या निर्णयामुळं डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
Best Picture on Internet today #ShameOnMI pic.twitter.com/h9uhxgjzqy
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) December 15, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Best Picture on Internet today #ShameOnMI pic.twitter.com/h9uhxgjzqy
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) December 15, 2023Best Picture on Internet today #ShameOnMI pic.twitter.com/h9uhxgjzqy
— Ctrl C Ctrl Memes (@Ctrlmemes_) December 15, 2023
हार्दिकला कर्णधार बनवणं पडू शकतं महागात : हार्दिकनं आयपीएलच्या मागील दोन हंगामात गुजरात टायटन्सचं यशस्वीरित्या नेतृत्व केलंय. पदार्पणाच्या हंगामातच गुजरातला विजेता बनवण्यात हार्दिकची महत्त्वाची भूमिका होती. पण हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनवणं या फ्रँचायझीला महागात पडू शकतं. कारण तो प्रभावी अष्टपैलू खेळाडू असला तरी तो सतत दुखापतग्रस्त असतो. आताही तो दुखापतीमुळं क्रिकेटपासून दूर आहे. नुकत्याच झालेल्या 2023 च्या विश्वचषकातही केवळ तीन सामने खेळून तो स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्यामुळं अशा खेळाडूकडं संघाचं नेतृत्त्व सोपवणं मुंबईला भारी पडू शकतं.
-
Mumbai Indians have lost more than 4 lakh active followers since last night.
— Rudhra Nandu (@rudhranandu) December 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Rohit Sharma's fans on every platform, have started unfollowing the account.#ShameOnMI #RohitSharma #MumbaiIndians #IPL2024 pic.twitter.com/vIoHkm5h1G
">Mumbai Indians have lost more than 4 lakh active followers since last night.
— Rudhra Nandu (@rudhranandu) December 16, 2023
Rohit Sharma's fans on every platform, have started unfollowing the account.#ShameOnMI #RohitSharma #MumbaiIndians #IPL2024 pic.twitter.com/vIoHkm5h1GMumbai Indians have lost more than 4 lakh active followers since last night.
— Rudhra Nandu (@rudhranandu) December 16, 2023
Rohit Sharma's fans on every platform, have started unfollowing the account.#ShameOnMI #RohitSharma #MumbaiIndians #IPL2024 pic.twitter.com/vIoHkm5h1G
पर्यायी कर्णधार शोधावा लागणार : मुंबई संघाला हार्दिकचा फिटनेस पाहता एक पर्यायी कर्णधारदाराचा पर्यायदेखील पाहावा लागेल. त्याच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्त्व कोण करेल याचा फ्रँचायझीला शोध घ्यावा लागेल. कारण नियमित कर्णधार उपस्थित नसल्यास संघ मोठ्या अडचणीत सापडतो. आपीएलच्या मागील हंगामात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांचे नियमित कर्णधार अनुपस्थित असल्यानं या फ्रँचायझीला मोठा फटका बसला होता. तसंच त्याला सतत होणाऱ्या दुखापतींमुळं मुंबईचा संघ त्याला अष्टपैलू म्हणून मैदानात उतरवेल का हेदेखील पहावं लागेल.
-
💔
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) December 16, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">💔
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) December 16, 2023💔
— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) December 16, 2023
संघाची एकता धोक्यात : हार्दिक पांड्याला कर्णधार बनवल्यानं मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे या निर्णयामुळं संघातील एकतेलाही धोका निर्माण होऊ शकतो. रोहितनं आपल्या नेतृत्वात संघ चांगल्या प्रकारे एकसंध ठेवला होता. तसंच रोहितप्रती प्रत्येक खेळाडूच्या मनात आदर पाहायला मिळतो. पण पांड्याच्या बाबतीत हे शक्य होईल का? कारण रोहितच्या तुलनेत हार्दिकचा अनुभव फार कमी आहे. मुंबईच्या या निर्णयामुळं या संघातील खेळाडूही नाराज असल्याचं दिसतंय. अशा परिस्थित याचा परिणाम सांघिक कामगिरीवर होऊ शकतो.
मुंबई इंडियन्समध्ये 'ऑल इज नॉट वेल' : हार्दिक पांड्याच्या ट्रेडपासून मुंबई इंडियन्ससाठी सर्व काही आलबेल नसल्याचं दिसून येतंय. काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराहनंही एक इन्स्टाग्राम स्टोरी पोस्ट केली होती. त्यावरून बुमराह खूश नसल्याचं दिसून आलं. विशेष म्हणजे हार्दिक पांड्याला कर्णधार बनवण्याच्या पोस्टवर मुंबई इंडियन्सच्या कोणत्याही खेळाडूनं अद्याप आपलं मत व्यक्त केलेलं नाही. व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळं संघात नाराजी असल्याचं यावरुन स्पष्ट होतंय. सूर्यकुमार यादवही रोहित शर्माच्या कर्णधारपदावरून जाण्यानं नाराज असल्याचं दिसतय. सूर्यानं आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. मात्र, त्यानं त्यात काहीही लिहिलं नाही किंवा कोणाला टॅगही केलेलं नाही. सूर्यानं फक्त एक इमोजी पोस्ट केलाय. हा तुटलेल्या हार्टचा इमोजी आहे. सूर्यानं हा इमोजी X (पूर्वीचं ट्विटर) तसंच इन्स्टाग्राम स्टोरीवरही टाकलाय. हे फक्त रोहित शर्मासाठीच असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
- चाहत्यानं जाळली मुंबई इंडियन्सची जर्सी : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्यानं चाहते सोशल मीडियावर प्रचंड संतापले आहेत. एका चाहत्यानं मुंबई इंडियन्सच्या जर्सीला आग लागल्याचा व्हिडिओ शेअर केलाय. तर एकजण पाय चिरडून मुंबईची टोपी पेटवत आहे. चाहते मुंबईचा झेंडाही पेटवत आहेत. रोहित शर्माचा जन्म महाराष्ट्रातील आहे. तर हार्दिक पंड्याचा जन्म हा गुजरातमधील आहे. अनेकदा मुंबईतच महाराष्ट्रातील लोकांवर अन्याय होत असल्याची भावना आहे. त्यातच रोहित शर्माला डावलल्यानं महाराष्ट्र विरुद्ध गुजरात असे चित्र निर्माण झाले.
सोशल मिडियावर 5 लाखांहून अधिक फॉलोअर्स झाले कमी : रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवल्याचा परिणाम मुंबई इंडियन्सच्या सोशल मीडिया अकाउंटवरही दिसून येत आहे. हार्दिकला कर्णधार बनवण्यात आलं तेव्हा मुंबईचे इंस्टाग्रामवर 13.2 मिलियन फॉलोअर्स होते. यानंतर काही तासांतच मुंबईचे फॉलोअर्स 12.8 दशलक्षांवर पोहोचले आहेत. X वरही, मुंबईचे फॉलोअर्स 8.6 दशलक्ष वरुन 8.2 दशलक्ष इतके कमी झाले आहेत. चाहत्यांचा राग पाहता संघाचे आणखी फॉलोअर्स कमी होऊ शकतात.
हेही वाचा :