नवी मुंबई: जगातील सर्वात मोठी टी-20 लीग आयपीएलच्या पंधराव्या हंगामाला 26 मार्चला म्हणजे फक्त तीन दिवसात सुरुवात होणार आहे. या हंगामाच्या ट्रॉफीवर दावेदारी सिद्ध करण्यासाठी दहा संघ सज्ज झाले आहे. प्रत्येक संघाचे अधिकत्तर खेळाडू संघासोबत जोडले गेले आहेत. त्यानंतर बुधवारी मुंबई इंडियन्स संघची पत्रकार परिषद पार पडली. ज्यासाठी संघाचा कर्णधार रोहित शर्मा ( Captain Rohit Sharma ) आणि मुख्य प्रशिक्षक माहेला जयवर्धने उपस्थित होते.
-
🚨 PRESS CONFERENCE TIME 🚨
— Mumbai Indians (@mipaltan) March 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Rohit Sharma & Mahela Jayawardene are here to address the press in this season's first PC! 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians pic.twitter.com/yM2C14W5CS
">🚨 PRESS CONFERENCE TIME 🚨
— Mumbai Indians (@mipaltan) March 23, 2022
Rohit Sharma & Mahela Jayawardene are here to address the press in this season's first PC! 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians pic.twitter.com/yM2C14W5CS🚨 PRESS CONFERENCE TIME 🚨
— Mumbai Indians (@mipaltan) March 23, 2022
Rohit Sharma & Mahela Jayawardene are here to address the press in this season's first PC! 💙#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians pic.twitter.com/yM2C14W5CS
रोहित शर्मा आणि माहेला जयवर्धने यांच्या उपस्थित पार पडलेल्या पत्रकार परिषदेत अनेक महत्वाच्या गोष्टींचा खुलासा आणि काही भूमिका स्पष्ट करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याबद्दलच्या काही गोष्टींचा खुलासा करण्यात आला. संघाचा महत्वाचा खेळाडू सुर्यकुमार यादव ( Batsman Suryakumar Yadav ) हा अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. त्यामुळे तो पहिल्या सामन्यात मुकण्याची शक्यता आहे.
-
Mahela: "We will create our own plans & we are excited to have all these new bowlers who have brilliant skillsets." #OneFamily #DilKholKe #MumbaiIndians
— Mumbai Indians (@mipaltan) March 23, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mahela: "We will create our own plans & we are excited to have all these new bowlers who have brilliant skillsets." #OneFamily #DilKholKe #MumbaiIndians
— Mumbai Indians (@mipaltan) March 23, 2022Mahela: "We will create our own plans & we are excited to have all these new bowlers who have brilliant skillsets." #OneFamily #DilKholKe #MumbaiIndians
— Mumbai Indians (@mipaltan) March 23, 2022
रोहित शर्मा म्हणाला, सुर्यकुमार यादव हा दुखापती मधून सावरत आहे. तो सध्या एनसीएमध्ये आहे. तो आमच्या संघासोबत जोडला जाण्याची आम्ही वाट पाहत आहोत. तो एनसीएकडून परवानगी मिळताच आमच्या संघात दाखल जोडला जाईल.
घरच्या मैदानाचा फायदा होणार का? या प्रश्नाचे उत्तर देताना मम्हणाला, यंदा आमचा संघ नवीन आहे. त्यामुळे यंदा महाराष्ट्रात होणाऱ्या सामन्याचा आम्हाला फायदा होईल, असे वाटत नाही. कारण यंदा आमच्या ताफ्यात 70 ते 80 टक्के खेळाडू नवीन आहेत. ज्यांनी या अगोदर मुंबईत सामनेच खेळले नाहीत.
त्याचबरोबर हार्दिक पांड्याबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला ( Rohit Sharma on Hardik Pandya ), मुंबई इंडियन्सच्या यशात हार्दिक पांड्याचा महत्वाचा वाटा आहे. यंदा हार्दिक पांड्या आपली नवीन इनिंग सुरु करतोय. त्यामुळे त्याच्यापुढे या हंगामात नवीन आव्हान असणार आहे.