पुणे: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील 23 वा सामना बुधवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज ( Mumbai Indians vs Punjab Kings ) संघात खेळला गेला. पुण्यातील एमसीए क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या सामन्यात पंजाबने 12 धावांना विजय मिळवला. त्यामुळे मुंबई इंडियन्स संघाला सलग पाचवा सामना गमवावा लागला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्स संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. ज्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार आणि प्लेइंग इलेव्हन संघातील खेळाडूंवर कारवाई करण्यात आली आहे.
-
Punjab Kings return to winning ways! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
The Mayank Agarwal-led unit register their third win of the #TATAIPL 2022 as they beat Mumbai Indians by 12 runs. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/emgSkWA94g#TATAIPL | #MIvPBKS pic.twitter.com/fupx2xD2dr
">Punjab Kings return to winning ways! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
The Mayank Agarwal-led unit register their third win of the #TATAIPL 2022 as they beat Mumbai Indians by 12 runs. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/emgSkWA94g#TATAIPL | #MIvPBKS pic.twitter.com/fupx2xD2drPunjab Kings return to winning ways! 👏 👏
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2022
The Mayank Agarwal-led unit register their third win of the #TATAIPL 2022 as they beat Mumbai Indians by 12 runs. 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/emgSkWA94g#TATAIPL | #MIvPBKS pic.twitter.com/fupx2xD2dr
पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघाने निर्धारीत वेळेनुसार षटके टाकण्यास उशीर केल्याबद्दल त्यांना दंड ठोठावण्यात ( Mumbai Indians fined ) आला आहे. ज्यामध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला 24 लाख रुपये आणि उर्वरित संघातील खेळाडूंना 6 लाख रुपये किंवा सामना फीच्या 25 टक्के दंड आकारण्यात आला आहे. कारण या हंगामातील मुंबई संघाचा हा दुसरा गुन्हा आहे. त्यामुळे मोठी कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई इंडियन्सला 13 एप्रिल रोजी पुण्यातील एमसीए स्टेडियमवर पंजाब किंग्ज विरुद्धच्या च्या सामन्यात स्लो ओव्हर-रेट ( Slow over-rate ) ठेवल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे, आयपीएलने एका निवेदनात म्हटले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, आयपीएलच्या आचारसंहितेनुसार ( According IPL Code of Conduct ) किमान ओव्हर रेटच्या गुन्ह्यांशी संबंधित पंधराव्या हंगामातील हा संघाचा दुसरा गुन्हा आहे.
तत्पूर्वी, मुंबई इंडियन्स पहिल्या विजयाच्या शोधात मैदानात उतरली होती. मात्र रोमहर्षक सामन्यात पुण्यात त्यांना 12 धावांनी ( Punjab Kings won by 12 runs ) पराभव पत्करावा लागला. 199 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, मुंबईकडून युवा डेव्हाल्ड ब्रेव्हिस (25 चेंडूत 49) आणि तिलक वर्मा (20 चेंडूत 36) आणि सूर्यकुमार यादव (30 चेंडूत 43) यांनी चांगला खेळ केला, पण पंजाबच्या गोलंदाजांनी एमआयला 20 षटकांत 9 बाद 186 धावांवर रोखले. पंजाबकडून गोलंदाज ओडियन स्मिथने (4 षटकात 4/30) बळी घेत दमदार कामगिरी केली.
हेही वाचा - MI vs PBKS IPL 2022 : मुंबई इंडियन्सवर पंजाब किंग्जचा 12 धावांनी विजय