ETV Bharat / sports

'राहुल प्रशिक्षक आणि धोनी मेंटॉर झाला नाही तर माझी निराशा होईल'

एक प्रशिक्षकाच्या रुपात राहुल आणि मेंटॉरच्या रुपात एम एस धोनी भारतीय क्रिकेटसाठी आणि भारतीय संघासाठी एक वरदान ठरतील. दोघेही शांत आणि कष्टाळू आहेत. जर राहुल प्रशिक्षक आणि धोनी मेंटॉर झाला नाही तर माझी निराशा होईल, असे एमएसके प्रसाद यांनी म्हटलं आहे.

msk-prasad-says-he-want-rahul-dravid-as-coach-and-ms-dhoni-as-mentor-in-team-india-after-ravi-shastri-era
'राहुल प्रशिक्षक आणि धोनी मेंटॉर झाला नाही तर माझी निराशा होईल'
author img

By

Published : Sep 30, 2021, 7:58 PM IST

मुंबई - भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ लवकरच संपणार आहे. यामुळे भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा रंगली आहे. अशात बीसीसीआयचे माजी मुख्य निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

एमएसके प्रसाद यांनी प्रशिक्षकपदासाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड याच्या नावाची शिफारस केल्याचे वृत्त आहे. शास्त्री भारतीय संघाचे प्रशिक्षकपदाची भूमिका 2017 पासून निभावत आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर ते प्रशिक्षकपदावरुन पायउतार होण्याची शक्यता आहे.

प्रसाद यांनी स्पोर्टस तकशी बोलताना सांगितलं की, मला माझ्या एका सहकाऱ्याने सांगितलं होतं की, रवी शास्त्री यांच्यानंतर नक्कीच धोनी मेंटॉर म्हणून तर राहुल द्रविड हा प्रशिक्षक म्हणून पाहायला मिळतील.

जेव्हा मी आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत होतो. तेव्हा माझी सहकारी समालोचकांसोबत ही चर्चा केली. राहुल द्रविडकडे खूप अनुभव आहे. ते पाहता तो रवी शास्त्री यांच्यानंतर भारतीय संघासाठी खूप मुल्यवान ठरणार आहे, असे देखील प्रसाद यांनी सांगितलं.

एक प्रशिक्षकाच्या रुपात राहुल आणि मेंटॉरच्या रुपात एम एस धोनी भारतीय क्रिकेटसाठी आणि भारतीय संघासाठी एक वरदान ठरतील. दोघेही शांत आणि कष्टाळू आहेत. महत्वाची बाब म्हणजे संघातील बहुतांश खेळाडू राहुल द्रविड याच्या मार्गदर्शनात तयार झालेले आहेत. जर राहुल प्रशिक्षक आणि धोनी मेंटॉर झाला नाही तर माझी निराशा होईल, असे देखील प्रसाद यांनी सांगितलं.

हेही वाचा - IPL 2021 : दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने मोडला विरेंद्र सेहवागचा रेकॉर्ड

हेही वाचा - लग्नासाठी कशी मुलगी हवी? नीरज चोप्राने लाजून दिलं उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.